(फोटो सौजन्य: Instagram)
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक व्यक्ती माईक घेऊन तरुणाला प्रश्न विचारताना दिसतो तो म्हणतो की, “तुम्ही नीट परीक्षा थांबवायला गेलात आणि मग लग्न करुन आलात?” यावर तरुण आपले नाव मोहन श्रीवास्तव असल्याचे सांगतो आणि मग उत्तर देतो, “आम्ही जंतर मंतरवर १५ दिवस राहिलो, आणि तिथे खायला-प्यायला काहीही उपलब्ध नव्हतं. आम्ही कसं तरी निभावून नेलं.” यानंतर तो मुलीला कसं भेटला ते स्पष्ट करतो.
मोहन सांगतो की, आंदोलनात मॅडम त्याला कधी लवंग कधी छेना, तर कधी शिंगाडा खायला द्यायची”. रोज ती त्याला काही ना काही खायला द्यायची. मोहनने सांगितले की, तरुणीचा नीट पेपर लीक झाला होता ज्यामुळे ती आंदोलनात सामील झाली होती. यादरम्यान जेवणाचे वाटप करताना तिची मोहनसोबत भेट झाली आणि त्यांच्यात संवाद सुरु झाला.
या संभाषणादरम्यान व्यक्ती तरुणाच्या डोक्यावर असलेल्या पट्टीला पाहून प्रश्न केला की, “तुम्हाला दुखापत कशी झाली?”. यावर मोहनने उत्तर देत सांगितले की, 20 जुलै रोजी लाठाचार्जदरम्यान त्याला ही दुखापत झाली. यानंतर तरुणीनेच त्याचे उपचार केले आणि शुद्धीवर आल्यानंतर त्याच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. यानंतर दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं. पण जेव्हा आंदोलनातून ते घरी बिहारला पोहचले तेव्हा आईने हा विवाह मान्य करण्यास नकार दिला. यावर व्यक्ती उत्तर देत म्हणतो की, “तुम्ही लोक तिथे राजीनाम्याची मागणी करायला गेला होतात आणि काय करुन आलात”.
View this post on Instagram
हा व्हिडिओ @pmbiharicomedy2 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “ही सर्व खोटी कथा आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे यार पुन्हा आंदोलन केव्हा होणार, मी माझ्या सिंगल मित्राला आंदोलनात पाठवेल”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “जंतर-मंतरच्या आंदोलनाचा खरा फायदा यालाच झालेला दिसतोय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






