(फोटो सौजन्य: Instagram
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत दिसणारे हे दृष्य छपरा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर घडल्याची माहिती आहे. इथल्या रेल्वे स्थानकावर म्हशींचा कळप बिनधास्तपणे फिरताना दिसला, तर दुसऱ्या व्हिडिओत बकऱ्या देखील ट्रेनच्या एका डब्यात आरामात बसून प्रवास करताना दिसल्या. गावातील एक मोकळ्या शेतात फिरावं याप्रमाणे म्हशी कोणतीही काळजी न करता शहरातील रेल्वे प्लॅटफाॅर्मवर फिरताना दिसल्या तर बकरीही आरामात रेल्वेच्या आत बसून प्रवासाची मजा लुटताना दिसल्या. गावातील हे प्राणी शहरात कसे आले याची कल्पना कुणालाच नाही पण त्यांच्या या सरप्राईज आगमणाने यूजर्सना मात्र आश्चर्याचा धक्का दिला आहे. अनेकजण व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त करत असून त्याही गावातून नोकरीसाठी शहरात आल्या असाव्या अशा मिश्किल प्रतिक्रिया व्हिडिओला दिल्या जात आहेत.
View this post on Instagram
२२९ किमीचा जीवदान प्रवास! वंदे भारतमधून धावलं धडधडतं हृदय; VIDEO पाहून सर्वच हैराण
हा व्हिडिओ @hariom_vlog1 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘छपरा जंक्शनवर हा कोणता प्रवासी आला आहे’. व्हिडिओला ३ लाखाहून अधिकचे व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “कदाचित त्यांनाही त्यांच्या भविष्याची चिंता वाटत असेल, की बिहार सोडून जाणेच योग्य आहे का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ॲडव्हान्स बुकिंग करुन आल्याचं दिसतंय”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बिहारमध्ये काहीही घडू शकतं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






