(फोटो सौजन्य: Instagram)
काय आहे प्रकरण?
शिवानीने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, मागील काही काळापासून तिच्या घरातून पैसै अचानक गायब होत होते. सुरुवातीला तिला वाटलं की ही तिची चूक किंवा गैरसमज असावा पण पुन्हा पुन्हा पैसै गायब होत असल्याने तिच्या मनात संशय येऊ लागला. शिवानीने सांगितल्याप्रमाणे, तिच्या घरात कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त फक्त त्यांच्या घरातील कामवाली बाई घरात वावरत होती. अशात सत्य जाणून घेण्यासाठी तिने आपल्या घरात एक हिडन कॅमेरा बसवून घेतला.
प्लॅननुसार शिवानीने नोटांची पर्स जाणून बुजून अशा ठिकाणी ठेवली जिथे हिडन कॅमेरा बसवण्यात आला होता. यानंतर त्या कॅमेराच्या मदतीने ती सर्व घटनाक्रमावर लक्ष ठेवू लागली. याच हिडन कॅमेरात शिवानीला पैशांची चोरी कोण करतय ते समजलं आणि याचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर शेअर केला. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, कामाला आल्यानंतर काही वेळातच कामवाली बाईची नजर शिवानीच्या पर्सवर जाते. आरोपानुसार, पर्स पाहताच ती त्यातून काही पैसै चोरुन घेते. ही संपूर्ण घटना आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे.
View this post on Instagram
शिवानीला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा तिने कामवाली बाईला याची विचारणा केली. तिने सुरुवातीला आपली चूक स्वीकारण्यास नकार दिला पण कॅमेरात कैद झालेला पुरावा पाहताच स्थिती बदलून गेली. शिवानीने सांगितले की प्रकरण वाढल्यानंतर तिने पोलिसांनाही याची माहिती दिली ज्यानंतर पोलिसांनी या घटनेची चाैकशी सुरु केली. यानंतर कामवाली बाईकडून तक्रार मागे घेण्याची विनंती केली गेली ज्यानंतर तिला समज देऊन कुटुंबाने हे प्रकरण मिटवले आणि कायदेशीर कारवाई पुढे वाढवली नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






