(फोटो सौजन्य: Instagram)
भारतात जुगाडू लोकांची काही कमतरता नाही. जेव्हाही एका साध्या गोष्टीचे स्वस्तात सोल्यूशन हवे असेल तेव्हा देसी माणूस या जुगाडाच्या वाटेवर चालू लागते. व्हिडिओत तरुणानेही उन्हापासून वाचवण्यासाठी असेच काहीसे केले. जुगाड पाहायला विचित्र असला तरी यूजर्सने तरुणीच्या आयडियाचे काैतुक केले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, एक मुलगा भरउन्हात सायकलवरुन कुठेतरी जात आहे. कडक उन्हातून फिरताना आपल्याला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी तरुणीने डोक्यावर सोलार पॅनेल बसवलेले असते. यासोबतच त्याच्या तोंडाजवळ एक फॅन देखील दिसतो जो सोलार पॅनेलशी जोडलेला असतो. सोलार पॅनेलवर सूर्याची किरणे पडताच विजेशिवाय फॅन सुरु होते आणि उन्हातून जातानाही तरुणाला फॅनची हवा खाता येते.
View this post on Instagram
या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओला आतापर्यंत १० हजाराहून अधिक लोकांनी लाईक्स दिले आहेत. व्हिडिओ @maximum_manthan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘उन्हाळ्यासाठी नवीन जुगाड’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “सोलार सायकल नाही हा तर सोलार माणूस आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर पंखा खराब झाला तर….” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “जर याला घालून तुला साध्या गल्लीत नीट फिरता येत नसेल तर मेन रोडवर याला घेऊन तु कशी गाडी चालवणार? ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






