फोटो सौजन्य- pinterest
पालघर जिल्ह्यात वसलेले श्री वज्रेश्वरी देवी मंदिर हे देवीच्या जागृत शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. इ.स. १७३९ मध्ये पेशवे बाजीराव प्रथम यांचे बंधू आणि पराक्रमी सेनानी चिमाजी अप्पा यांच्या संकल्पातून हे मंदिर उभारण्यात आले आहे. वज्रेश्वरी देवी ही आदिशक्तीचे स्वरूप मानली जाते. भाविकांच्या श्रद्धेनुसार देवी संकटांचे निवारण करते, धैर्य, शक्ती आणि मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वाद देते. देवीच्या दर्शनाने मनःशांती लाभते आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. काय आहे वज्रेश्वरी देवीचा महिमा आणि तिच्या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वज्रेश्वरी गावात असल्यावर श्री योगेश्वरी योगिनी देवी मंदिर हे राज्यातील अत्यंत जागृत शक्तिस्थान मानलं जातं. मुंबईपासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर तानसा नदीच्या परिसरात आणि निसर्गरम्य डोंगरावर वसलेलं आहे. आजूबाजूच्या गरम पाण्याच्या कुंडामुळे येथील गणेशपुरी हे ठिकाण धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध आहे.
वज्रेश्वरी नावामागे एक सुंदर आख्यायिका सांगितले जाते ती अशी की, एकदा देवराज इंद्रानी महर्षी वशिष्ठ यांच्यावरती वज्र सोडले तेव्हा आदीशक्ती पार्वती यांनी ऋषींच रक्षण करण्यासाठी अवतार धारण केला ते वज्र स्वतःमध्ये सामावून घेतले त्यामुळे ते वज्रेश्वरी या नावाने प्रसिद्ध झाल्या. पुढे भगवान श्रीरामांनी वनवासादरम्यान या प्रदेशात देवीची आराधना केली आणि देवीला इथेच कायम वास्तव्य करण्याची विनंती केली तेव्हापासून हे स्थान वज्रेश्वरी देवीचं पवित्र क्षेत्र मानलं जातं. आज दिसणाऱ्या मंदिरांचा इतिहास मराठा साम्राज्याची जोडलेला आहे.
सन 1739 मध्ये पेशवे बाजीराव प्रथम यांचे धाकटे बंधू आणि पराक्रमी सेनानी चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईच्या किल्ल्यावर स्वारी केली. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर ही विजय मिळत नव्हता तेव्हा त्यांनी वज्रेश्वरी देवीला नवस केला विजय मिळाल्यास तुझं भव्य मंदिर उभारेल. लोकपरंपरेनुसार देवीने स्वप्नात चिमाजी अप्पांना विजयाचा मार्ग दाखवला. अखेर 16 मे 1739 रोजी मराठ्यांनी वसई किल्ला जिंकला. नवस पूर्ण करण्यासाठी चिमाजी अप्पांनी येथे भव्य मंदिर उभारण्याचा आदेश दिला. मंदिराची रचना वसई किल्ल्याच्या स्थापत्यशैलीची आठवण करून देते.
वज्रेश्वरी देवीचे मंदिर डोंगरावरती असून किल्ल्यासारखी मजबूत तटबंदी याला सुद्धा आहे. प्रवेशद्वारावरील नगरखाना हे याचे मुख्य आकर्षण आहे. गाभाऱ्यात मुख्य भागी वज्रेश्वरी देवीची मूर्ती असून बाजूला रेणूका माता आणि महाकाली यांच्या मूर्ती आहेत. मंदिराभोवती सुंदर डोंगररांगा आणि नैसर्गिक वातावरण असल्यामुळे भक्तांना अध्यात्मिक शांततेचा अनुभव येतो. वज्रेश्वरीपासून काहीच अंतरावरती गणेशपुरी परिसरात अनेक नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत.
धार्मिक श्रद्धेनुसार हे झरे देवीच्या शक्तीचं प्रतीक मानले जातात. या देवीच्या मंदिरात चैत्र नवरात्र, अश्विन नवरात्र, पौर्णिमा आणि अमावस्या साजरी केली जाते. याशिवाय देवीची वार्षिक यात्रा देखील काढली जाते. या काळात महाराष्ट्रासह गुजरात आणि देशभरातून हजारो भाविक वज्रेश्वरीच्या दर्शनासाठी येतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: वज्रेश्वरी देवीचे मंदिर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वज्रेश्वरी गावात असून ते मुंबईपासून सुमारे ७५ किमी अंतरावर आहे.
Ans: इ.स. १७३९ मध्ये वसई किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी नवस फेडण्यासाठी या मंदिराची उभारणी केली, अशी परंपरा सांगितली जाते.
Ans: किल्ल्यासारखी तटबंदी, भव्य प्रवेशद्वार, वज्रेश्वरी देवीची मूर्ती, तसेच रेणुका माता आणि महाकाली यांच्या मूर्ती हे मंदिराचे प्रमुख आकर्षण आहेत.






