(फोटो सौजन्य: Instagram)
नक्की काय घडलं ?
माहितीनुसार ही घटना राजस्थानच्या डीग येथील एका लग्नसमारंभात घडून आली. यामध्ये नवरदेवाने ५०० रुपयांच्या नोटांचा एक भलामोठा हार घातला होता. मुख्य म्हणजे त्याची लांबी इतकी जास्त होती की या हाराला घालण्यासाठी वराला छतावर जाऊन उभे रहावे लागले. छतापासून जमिनीपर्यंत हा हार पसरल्याचे दिसले, यावरुनच आपण याच्या लांबीचा अंदाज लावू शकतो. हा इतका मोठा हार होता की अनेक लोकांना मिळून त्याला सांभाळावे लागले. हे असे भव्य देखावे अनेकदा प्रादेशिक परंपरांशी जोडलेले असतात, जिथे लग्नाला प्रतिष्ठा आणि उत्सवाचे प्रतीक मानले जाते. हा व्हिडिओ पुन्हा एकदा अधोरेखित करतो की आधुनिक सोहळे परंपरा आणि ऐश्वर्य यांचा मेळ कसा घालत आहेत.
स्थानिकांच्या मते, हे एका लग्नसमारंभातील दृष्य होते. सांगितले जात आहे की, हा हार ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांपासून तयार करण्यात आला होता आणि त्याची लांबी १०० फूट एवढी होती. हे लग्न १९ एप्रिल रोजी पार पडले आणि त्यावेळीच नवरदेवाला हा भलामोठा पैशांचा हार घालण्यात आला. गावचे सरपंच यांनी सांगितले की, हा हार घालणे ही एक स्थानिक परंपरा असून, तो खास या प्रसंगासाठी मागवण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ @bharatvars_official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने पसरत असून यूजर्स यातील दृष्ये पाहून अवाक् झाले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






