Stunt Video : मुलींसमोर हिरोगिरी आली अंगलट; इंप्रेस करण्यासाठी बाईक स्टंट करायला गेले अन्..., पाहा काय घडलं, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
माणसालाही लाजवेल अशी शहाणपणाची कृती; पाणी पिऊन माकडांनी बंद केला नळ, Video Viral
व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक पेट्रोल पंप दिसत आहे. तिथे दोन तरुण इंधन भरण्यासाठी आले आहे. सुरुवातील सर्व काही सामान्य आहे. तिथेच काही अंतरावर दोन मुली उभ्या असलेल्या दिसतात. हे पाहून गाडी चालवणाऱ्याच्या अंगात अतिउत्साह येतो. मुलींना इंप्रेस करण्यासाठी बाईकवर स्टायलिश पोझ देण्याचा प्रयत्न करतो. पण हा स्टंट त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. अचानत तरुणाचा तो जातो आणि बाई अनिंयत्रित होऊन वेगावने पुढे जाते अन् थेट पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्याला जाऊन धडकते. याच वेळी तिथे एक दुसरा बाईकवाला पेट्रोल भरत असतो. तो तरुणाच्या कानशिलात लगावतो.
ये लौंडा दो लौंडिया को देखकर इतना जज्बाती हो गया है की इसने मोटरसाइकिल को पेट्रोल पंप के उपर चढ़ा दिया आगे क्या हुआ विडियो में देखिए😳 pic.twitter.com/mmicxAhiQL — Raksha Yatharth (@Rak_sha_2018) June 8, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ह कॅमेरात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Rak_sha_2018 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहत. अनेकांनी तरुणांची खिल्ली उडवली आहे. मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, अति आत्मविश्वास नडला पठ्ठ्याला, तर दुसऱ्या एकाने, कशाला नको ते उपद्वाप करायचे, झाली फजिती आता असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने भाऊ इंप्रेस करायला गेला अन् स्वत:ची इज्जत घालवून बसला असे म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






