Bangladesh Election : कोण असेल बांगलादेशचा पुढील पंतप्रधान? 'ही' चार नावे शर्यतीत, जाणून घ्या? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पतनानंतर बांगालदेशात मोठा गोंधळ सुरु होता. अनेक ठिकाणी अराजकतेचे वातावरण होते. सध्या निवडणूकीचे परिदृश्य देखील पूर्णपण बदलेले आहे. यावेळी पंतप्रधान पदासाठी नवे दावेदार समोर आले आहेत. हे दावेदार पहिल्यांदाच पंतप्रधान पदाच्या शर्यताती उतरले आहे. सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय संसदेत १५१ जागांची आवश्यकता आहे. तीन राजकीय पक्षांमध्ये लढत सुरु आहे. हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी असल्याने त्यांना निवडणूक लढवता येणार आहे. आज आपण हे नवे दावेदार कोण आहे ते जाणून घेणार आहोत.
तारिक रहमान – सध्या बांगलादेशाच्या पंतप्रधान शर्यतीत नवे चेहरे दिसत आहे. यामध्ये सर्वात अव्वल तारिक रहमान यांचे नाव आहे. तारिक रहमान हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया (Khaleda Zia) यांचे पुत्र आणि बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) चे सदस्य आहेत.सध्या ते लंडनमध्ये आहेत. बांगलादेशाच्या सर्वेक्षणानुसार, तारिक रहमान सध्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. खालिदा या शेवटच्या २००१ मध्ये पंतप्रधानपदी नियुक्त झाले होत्या. त्यानंतर त्यांचे कुटुंब सत्तेतून बाहेर पडले. परंतु सध्या तारिक रहमान सर्वेक्षण निकालात आघाडीवर असून त्यांची बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.
झुबैदा रहमान – खालिदा जिया यांच्या कुटुंबातीलच आणखी एक सदस्य म्हणजेच तारिक रहमान यांची पत्नी झुबैदा रहमान देखील सध्या आघाडीवर आहे. तारिक रहमानची पंतप्रधान म्हणून निवड न झाल्यास झुबैदा देखील सत्तेत येऊ शकतात. हसीना यांच्या सत्तापालटानंतर झुबैदा राजकारणात अधिक सक्रिय झाल्या आहेत. सध्या त्या लंडनहून देशात परतेलेला नाही. पण त्यांना ढाकातील पक्ष कार्यकर्त्यांसोबत निमित बैठका घेतल्या आहे. शिवाय बांगलादेशची स्थापना झाल्या पासून देशात महिलांचे नेतृत्व राहिले आहे. यामुळे झुबैदा यांची पंतप्रधान होण्याची शक्यता अधिक आहे.
अमीर शफीकुर – याच वेळी जमात-ए-इस्लामीचे अमीर शफीकुर रहमान यांनाही पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात आहे. हसीना यांच्या पतनानंतर जमात-ए-इस्लामीने निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. धर्माला मुद्दा बनवून सध्या जमातचे नेत मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
नाहिद इस्लाम – याच वेळी हसीना यांना सत्तेतून हाकलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम देखील पंतप्रधान पदाचा दावेदार मानला जात आहे. नाहिदच्या पक्षाने सात पक्षांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली आहे. तसेच तो युनूस सरकारमध्ये सल्लागार देखील होता.






