बायडेन प्रशासनात भारत-अमेरिका संबंध मजबूत; अमेरिकेचे NSA जेक सुलिवन यांची प्रतिक्रीया(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA)जेक सुलिव्हन यांनी भारत-अमेरिका संबंधावर मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, दोन्ही देश आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत यामध्ये बायडेन प्रशासनाचा हात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भारताला भेचट दिली होती. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली.
भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत
बायडेन प्रशासनाच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे दोन्ही देशाचे संबंध अधिक बळकट झाले असून पुठील प्रशासनासाठी एक मजबूत पाया ठरेल असेही त्यांनी म्हटले. सुलिवन यांनी व्हाइट हाऊसच्या रूझवेल्ट रूममध्ये आयोजित गोलमेज बैठकीदरम्यान म्हटले की, “आजच्या स्थितीत भारत-अमेरिका संबंध बायडेन प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीपैकी एक आहे.” हिंद-प्रशांत क्षेत्रातील सहयोगी आणि भागीदार देशांशी असलेल्या संबंधांचे सशक्तीकरण हे पुढील प्रशासनासाठी एक भक्कम पाया ठरेल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी भारत भेटींमुळे दोन्ही देशांत द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले.
उतार-चढावांनंतरही संबंध मजबूत
भारत-अमेरिका संबंधात गेल्या चार वर्षात काही काळात अनेक चढ-उतार आले. याचा उल्लेही सुलिवन यांनी केला. त्यांनी सांगितले की, त्यांनी सांगितले की, कोणत्याही द्विपक्षीय संबंधांमध्ये असहमती ही अपरिहार्य असते. व्यापार, अर्थव्यवस्था किंवा G20 घोषणापत्रातील शब्दावलीसारख्या विषयांवर मतभेद निर्माण होऊ शकतात. मात्र, संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी काम करणे महत्त्वाचे आहे.
सुलिवन यांनी सांगितले की, “गेल्या चार वर्षांत भारत-अमेरिका संबंध अधिकाधिक मजबूत झाले आहेत. काही मुद्द्यांवर असहमती राहिली पण, तरीही दोन्ही देशांनी विश्वास आणि सहकार्याने त्यावर तोडगा काढला आहे.” हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थैर्य राखण्यासाठी आणि जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारत-अमेरिकेचे एकत्रित प्रयत्न भविष्यातील संबंधांसाठी महत्वपूर्ण ठरतील, असे त्यांनी नमूद केले.
बायडेन प्रशासनाची भूमिका महत्त्वाची
भारत-अमेरिका संबंधांमध्ये बायडेन प्रशासनाने घेतलेले धोरण आणि त्यातील सकारात्मक बदल यामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक भक्कम झाली आहे. सुलिवन यांनी भारत दौऱ्यातील चर्चांमुळे द्विपक्षीय संबंधांची दिशा उज्ज्वल राहील, असा विश्वास व्यक्त केला.
बांगलादेशवर अमेरिकेची भूमिका
याशिवाय सुलिवन यांनी बांगलादेशच्या सत्तांतरामध्ये अमेरिकेची कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी खालिस्तानी चरमपंथी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या कथित हत्येच्या कटासंदर्भातील प्रकरण पुढील सरकारच्या कार्यकाळातही चालू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.