पंतप्रधान मोदी पोहोचले फ्रान्सला; अध्यक्ष मॅक्रॉनसोबत AI शिखर परिषदेत होणार सहभागी (फोटो सौजन्य: एक्स/@narendramodi)
पॅरिस: पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिसला पोहोचले आहेत. सध्या ते दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असून पॅरिसमधून याची सुरुवात झाली आहे. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत ‘AI ॲक्शन समिट’चे सह-संस्थापक सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदेचा उद्देश आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील धोरणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत करणे हा आहे. या समिटमध्ये जगभरातील तंत्रज्ञान तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय नेते आणि मोठ्या तांत्रिक कंपन्यांचे CEO सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
ही परिषद केवळ भारत-फ्रान्स AI सहकार्यास चालना देणार नाही, तर इतर देशांसाठी देखील एक आदर्श निर्माण करेल. या चर्चेत AI तंत्रज्ञानाच्या सुरक्षित आणि जबाबदार वापरावर भर दिला जाणार आहे.
Je viens d’atterrir à Paris. Je suis impatient d’y participer à différents événements dédiés à des secteurs d’avenir comme l’IA, la technologie et l’innovation. pic.twitter.com/hrR6xJu7o8
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2025
मोदी-मॅक्रॉन द्विपक्षीय चर्चेचे मुख्य मुद्दे
या दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणि 2047 च्या होरायझन रोडमॅप च्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार, संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, उर्जा आणि इतर अनेक क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण उत्पादन, हरित ऊर्जा आणि नवीन तंत्रज्ञान विकास यावरही चर्चा होणार आहे.
मार्सेली शहराचा दौरा आणि ऐतिहासिक उपक्रम
याशिवाय, या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या ऐतिहासिक मार्सेली शहरालाही भेट देणार आहेत. या ठिकाणी भारताच्या वाणिज्य धूतावासाचे उद्घाटन करण्यात येणार असून, याद्वारे भारतीय समुदाय आणि व्यवसायाच्या क्षेत्राच्या वाढीवर भर देण्यात येणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक रिअॅक्टर (ITER) प्रकल्पाला नरेंद्र मोदी भेट देणार आहेत.
शेवटी, पंतप्रधान मोदी मार्सेली येथील मजार्ग युद्ध स्मारकाला भेट देऊन, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. त्यांच्या या दौर्यामुळे भारत-फ्रान्स संबंध अधिक दृढ होतील आणि तांत्रिक तसेच धोरणात्मक सहकार्याला नवी दिशा मिळेल.