Hejaz Railway Project : होर्मुझला बायपास? मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी-तुर्कीत मोठा करार, जाणून घ्या काय आहे? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Apache Helicopter Crash : हेलिकॉप्टर क्रॅशनंतर अमेरिकेचा पलटवार? इराणवर अनेक ठिकाणांवर भीषण हल्ले
तुर्की आणि सौदी अरेबियातील हा प्रकल्प, तुर्की, सीरिया, जॉर्डन, सौदी अरेबाया(Saudi Arabia) ला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी तयार करण्यात येणार आहे. पुढे हा मार्ग ओमानपर्यंत विस्तारीत करण्याचीही योजना आहे. या मार्गाची एकूण लांबी सुमारे १,९०० किलोमीटर असेल. हा मार्गा होर्मुझ (Hormuz) आणि सुएज कालव्याला पर्याय मानला जात आहे. यामुळे आखाती बाजारपेठांमध्ये थेट जमिनीवरुन व्यापार करात येईल.
हेजाज रेल्वे प्रकल्पाची सुरुवात सुलतान अब्दुल हामित द्वितीय यांनी १९०० मध्ये केली होती. हा रेल्वे मार्ग दमास्कस ते मदीना दरम्यान पहिल्यांदा सुरु झाला होता. मुस्लिम यात्रेकरुंसाठी मक्का-मदीनाच्या ४० दिवसांची यात्रा या मार्गामुळे केवळ ५ दिवसांत पूर्ण झाली होती. मात्र पहिल्या महायुद्धात या मार्गाचे मोठे नुकसान झाले आणि बंद पडला. सध्या हा मार्ग तुर्की-सौदी संयुक्तपणे पुन्हा सुरु करत आहेत.
या प्रकल्पासाठी एप्रिलमध्ये तुर्की, सीरिया(Syria), आणि जॉर्डनमध्येही त्रिपक्षीय करार झाला होता. आता यामध्ये सौदी अरेबियाने सहभाग घेतला असून प्रकल्प अधिक मजबूत झाला आहे. या मा मार्गामुळे तुर्की युरोप आणि आखाती देशांमधील प्रमुख ट्रान्झिट बनण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेतील भू-राजकीय समीकरणात यामुळे मोठा बदल तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
🚨 An important and fruitful step for the region 🇸🇦🇹🇷 Saudi Arabia has signed an agreement with Turkey to launch a railway connecting the two countries via Syria, Jordan, and Oman. This great project will serve all these countries and their people, God willing. 💪🏻😎 A new… pic.twitter.com/gHk0TGjDNL — 🇸🇦Abdulsalam Saleh (@abdulslam2017) June 9, 2026






