Hormuz Attack : तीन दिवसांत तिसरा मोठा हल्ला! होर्मुझमध्ये जहाज MT Jalveer ला लक्ष्य; २० भारतीय नाविक धोक्यात? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Hormuz Attack : होर्मुझजवळ हल्ल्यातील ३ बेपत्ता नागरिकांचा मृत्यू, २ मृतदेह ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, MT Jalveer वर झालेल्या हल्ल्यामुळे जहाजाच्या इंजिन रुमला भीषण आग लागली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आले आहे. यामध्ये जहाजातून काळा धूर निघताना दिसत आहे. या जहाजावर २० भारतीय नाविक तैनात होते. सर्व नाविक सुरुक्षित असल्याचे सांगितले जातक आहे. ओमानमधील भारतीय दूतावासाने या घटनेची पुष्टी केली असून स्थानिक सरकारशी सतत संपर्कात असल्याचे म्हटले.
नुकत्या झालेल्या हल्ल्यापूर्वी बुधावरी (१० जून) एमटी सेटेबेलो जहाजावरही अमेरिकेने कारवाई केली होती. या जहाजावरही २४ भारतीय नागरिक होते. ज्यामध्ये २१ जणांचा वाचवण्यात आले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेपूर्वी सोमवारी एमटी मॅरिव्हेक्स जहाजावर हल्ला झाला होता. यातील सर्व भारतीय नाविक सुरक्षित आहेत.
🚨Another commercial vessel with Indian sailors on board attacked in Hormuz Strait MT Jalveer has come under attack off the Oman coast. The incident comes just one day after another attack on a commercial tanker off Oman left three Indian seafarers dead. pic.twitter.com/Ln65uPkkr0 — Sputnik India (@Sputnik_India) June 11, 2026
भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त
या घटनेची माहिती मिळताच भारत सरकारने तातडीने अमेरिकेचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी जेसन मिक्स यांच्याकडे कारवाईबाबत स्पष्ट मागितले. भारताने कठोर भूमिका घेत पश्चिम आशियातील व्यापारी जहाजांवर हल्ले थांबवण्याची मागणी केली. व्यापारी जहाजे आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा घटना थांबवण्यास भारताने सांगितले. यामुळे आतरराष्ट्रीय मार्गांवरही वाहतूकही प्रभावित होत असल्याची चिंता सरकारकडून व्यक्त करण्यात आली.
गेल्या दोन दिवसांत ही भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजांवरील कारवाईची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एमटी मॅरिव्हेक्स जहाजावरही अमेरिकन नौदलाने कारवाई केल्याचे वृत्त आहे. त्या जहाजावरही २४ भारतीय कर्मचारी होते. मिसाईल हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली होती. परंतु ओमानच्या कोस्ट गार्डला वेळेत माहिती मिळाल्याने सर्व भारतीयांना सुरक्षित वाचवण्यात यश आले.






