Hormuz Attack : होर्मुझजवळ हल्ल्यातील ३ बेपत्ता नागरिकांचा मृत्यू, २ मृतदेह ताब्यात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Oman Oil Tanker Fire : ओमान किनाऱ्याजवळ तेल टँकरला भीषण आग; २४ भारतीय नाविकांबाबत मोठी अपडेट
बुधवारी (०१ जून) होर्मुझ सामुद्रधुनीत ओमानच्या किनाऱ्याजवळ एमटी सेटेबोला या पलाउचा ध्वज असलेल्या जहाजावर हल्ला करण्यात आला होता. हे जहाज ओमानच्या आखातातून इराणच्या दिशेने प्रवास करताना सापडले असल्याचा आरोप अमेरिकेने केला. यामुळे ही कारवाई करण्यात आली असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले. या जहाजावर २४ भारतीय नाविक होते.
या घटनेनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण यंत्रणांनी तातडीने घटनेची दखल घेतली. ओमानच्या सरकारच्या मदतीने भारतीयांच्या बचावासाठी मदतकार्य राबवण्यात आले. यातील २१ भारतीय नाविकांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. यातील ३ जण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जणांचा मृतदेह सापडेल असून तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.
दरम्यान भारताने या हल्ल्यांवर नाराजी व्यक्त करत अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी री जेसन मिक्स यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. याचा तीव्र निषेध करत तातडीने मध्यपूर्वेतील हल्ले थांबवण्याची मागणी देखील केली आहे. यापूर्वी आणखी एका भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या एमटी मॅरव्हेक्स जहाजावर हल्ला झाला होता. त्यावेळी देखील २४ नागरिक जहाजावर उपस्थित होते. त्या सर्वांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
It is deeply unfortunate to learn of the tragic incident aboard the Palau-flagged MT Settebello. Sadly, three Indian seafarers initially reported missing are now confirmed dead after bodies have been located and identified. This is a profound loss to our maritime family. The… — Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) June 11, 2026






