नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनल आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (फोटो सौजन्य: एक्स/@DrSJaishankar)
अलीकडेच पंतप्रधान बालेन शाह यांनी भारत-नेपाळ सीमेबाबत एक अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक दावा केला होता. यामुळे त्यांना तीव्र टीकांचा सामना करावा लागला होता. त्यांनी भारताने नेपाळच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता. यावर नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनल यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बालेन शाह यांच्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ घेण्यात आला असल्याचे सांगितले.
दरम्यान शिशिर खनल यांचा हा भारत दौरा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या निमंत्रणवरुन होत आहे. खनल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेणार आहेत. तसेच इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतील
दरम्यान एस. जयंशकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भारत-नेपाळ सहकार्याला नवी गती मिळाली. या बैठकीत भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला. २०१५ च्या भूकंपानंतर पुनर्बांधणी प्रकल्पाअंतर्गत ७२ आरोग्य सुविधा आणि १२ सांस्कृतिक वारसा प्रकल्पांचे हस्तांतरण करण्यात आले. भारताच्या यूपीआय आणि नेपाळच्या राष्ट्रीय पेमेंट इंटफेसला जोडून सीमापार वैयक्तिक पैशांच्या व्यहाराला गती देण्याचे निश्चित धझाले. व्हाइस फर्स्ट भाषा भाषांतर प्लॅटफॉर्म विकिसत करण्यासाठीही करार करण्यात आला.
दरम्यान खनल यांनी भारताचे कौतुक केले आहे. त्यांनी भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीवर भाष्य केले. तसेच त्यांनी भारताला एक उदयोन्मुख आर्थिक आणि तांत्रिक पॉवरहाऊस संबोधले. तसेच नेपाळच्या प्रगतीचे श्रेय भारताला दिले. भारताच्या पाठिंब्यामुळे नेपाळच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले.
Following up on the productive meeting with FM Shisir Khanal @shisir #Nepal: ✅ Handed over virtually 72 health facilities & 12 cultural heritage projects under Reconstruction Programme post 2015 Earthquake. ✅ Jointly launched the linkage between @UPI_NPCI #India and National… pic.twitter.com/J5hvzDLrTc — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) June 6, 2026






