ग्लोबल साउथचे समीकरणात मोठा बदल होणार; दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग तीन दीवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिक द डिप्लोमॅटच्या मते, २०२६ हे दोन्ही देशांसाठी विशेष धोरणात्मक भागीदारीसाठी प्रभावी ठरणार आहे. या भेटीत संरक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रांत मोठे करार होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. दक्षिण कोरिया देखील विकसनशील देशांच्या हितासाठी भारतासोबत काम करण्यास उत्सुक आहे.
सध्या भारत हा जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण कोरिया भारतासाठी एक मोठी बाजारपेठ आणि विश्वासू भागीदार ठरु शकतो. दोन्ही देशांमध्ये संरक्षण उत्पादन आणि शिपबिल्डिंग क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. भारताने बनवलेल्या एफडीआय नियम आणि पायाभूत सुविधांमधील प्रगतीमुळे दक्षिण कोरिया भारतासाठी गुंतवणूकीचे उत्तर केंद्र ठरु शकतो.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, भारत आणि दक्षिण कोरिया संबंध केवळ दोन देशांपुरते मर्यादित नाहीत, तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या द्विपक्षीय चर्चेमुळे दोन्ही देशांच्या व्यापाराला नवी गती मिळणार आहे. यामुळे लोकशाहीला देखील बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला.






