Mojtaba Khamenei : 'अमेरिकन सैन्य फक्त कागजी शेर' ; मोजतबा खामेनेईं यांचे खळबळजनक विधान; अमेरिकेला हा गंभीर इशारा, युद्ध पेटणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मोजतबा खामेनेईं यांनी अमेरिकेच्या लष्करावर टीका केली आहे. अमेरिकेच्या सैन्याला कागदी शेर म्हणत आखाती देशातील अमेरिकन लष्करी तळ केवळ एक भ्रम असल्याचे म्हटले. खामेनेईंनी पाश्चात्य देशांच्या हस्तक्षेपावर संताप व्यक्त केला. अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना इशारा देत त्यांनी, परकीय (America) लष्करी तळ स्वत:च्या संरक्षणाची हमी देऊ शकत नाही, तर ते संपूर्ण क्षेत्राचे रक्षण कसे करणार असा प्रश्न केला. तसेच बाह्यशक्तींवर अवलंबून राहणे धोक्याचे असल्याचेही म्हटले.
याशिवाय खामेनेई यांनी पर्शियन गल्फ डेच्या निमित्त आपल्या भाषणात म्हटले की, हा सागरी भाग इराणच्या सभ्यतेचा अविभाज्य आहे. याच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेत होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनीवरतून होणाऱ्या व्यापारावर बारीक लक्ष असून कोणत्याही शत्रूच्या हालचालींनी योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही खामेनेईंनी दिला. खामेनेईंच्या मते, अमेरिकेच्या होर्मुझमध्ये उपस्थितीमुळेच अस्थिरता निर्माण झाल्याचाही आरोप त्यांनी केली आहे.
एकीकडे तणाव कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात अमेरिकेला दोन अटींचा नवा प्रस्ताव पाठवला होता. पण हा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी फेटाळला आहे. कारण या करारात इराणने अणु कार्यक्रमावर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास नकार दिला आहे.
जोपर्यंत इराणी जहाजांची नाकेंबीद थांबत नाही, तोपर्यंत अणु करारावर कोणतीही चर्चा होणारी नाही असे इराणने म्हटले आहे. तर ट्रम्प यांनी इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा ही प्रमुख अट ठेवली आहे. सध्या दोन्ही देशांमधील तणाव वाढत असून याचा जागतिक बाजारपेठेला मोठा फटका बसत आहे.
Ans: मोजतबा खामेनेई यांनी अमेरिकन लष्करावर बोचरी टीका करत कागदी शेर संबोधले आहे.
Ans: स्वत:च्या संरक्षणासाठी बाह्य देशांवर अवलंबून राहणे योग्य नाही. जो देश आपल्याच सैन्याची रक्षा करु शकत नाही, तो इतर देशांची काय करणार असे म्हटले आहे.






