फोटो सौजन्य : झी मराठी
समर राजवाडेंची ही उर्मट मैत्रीण जेव्हा स्वानंदीला भेटते तेव्हा ती स्वानंदीला टोमणे मारते. प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं की, स्वानंदीला समरची एक्स गर्लफ्रेन्ड म्हणते की, तू आहेस तर सॅमची बायको. तुला एकंदरितच पाहता सॅमच लग्न खूपच कठीण आहे असं ती म्हणते. तेव्हा स्वानंदी तिला चांगलीच चपराक देते. स्वानंदी म्हणते की, गैरसमज आहे हा तुमचा. आमचं नातंअसं आहे ना एखाद्या एक्सला आमचं नातं देखील सुंदर वाटेल. समरच्या या एक्स गर्लफ्रेन्डची भुमिका साकरणारी अभिनेत्री म्हणजे पुर्वा गोखले. तब्बल 18 वर्षांनी सुबोध भावे आणि पुर्वा गोखले यांची जोडी पुन्हा एकदा मालिकेत एकत्र दिसणार आहे.
जाहिरातजाहिरातView this post on Instagram
A post shared by Pushpagandh Film Company (@pushpagandh_filmcompany)
Movie Review : ‘Raja Shivaji’ स्वराज्याचा झळाळता इतिहास आणि रितेश देशमुखचा मास्टरस्ट्रोक!!
2008 मध्ये कुलवधू या मालिकेतून विक्रमादित्य आणि देवयानी या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आजंही ही मालिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेनंतर आता पुन्हा एकदा पुर्वा गोखले आणि सुबोध भावे झी मराठीवर पुन्हा एकदा झळकणार आहेत. आता समर ही एक्स गर्लफ्रेन्डमुळे समर स्वानंदीच्या नात्यात काय नवीन वळण येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.






