Oil Tanker Hijack : येमेनच्या समुद्रात खळबळ! सोमालियाई डाकूंचा तेलवाहू जहाजावर ताबा, हाय-अलर्ट जारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिराती(UAE) च्या फुजैरा बंदरावरून युरेका जहाजाची रवानी झाली होती. परंतु अचानक एडनच्या आखातात काही सशस्त्र डाकूंनी या जहाजवर हल्लाबोल करत संपूर्ण ताबा मिळवला. हे जहाज सध्या सोमालियाच्या दिशेने वळवण्यात आले असल्याचे वृत्त मिळाले आहे. येमेनी कोस्ट गार्डने या घटनेची पुष्टी केली असून या घटनेने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, २०११ मध्ये संपूर्ण जगासाठी डोकेदुखील ठरलेले सोमालियाचे डाकू परत आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपामुळे या डाकूंनी माघार घेतली होती, ज्यामुळे हल्ले कमी झाले होते. परंतु गेल्या काही महिन्यात एडनच्या आखातत पुन्हा एकदा धोका वाढला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तवार गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी युरोपियन युनियनच्या नौदलाने संशयास्पद हालचालींमुळे इशाराही जारी केला होता.
सध्या जहाजावर किती कर्मचारी होते आणि त्यांची सद्यस्थि काय आहे याबाबत अस्पष्टता आहे. येमेनी कोस्ट गार्ड आणि आंतरराष्ट्रीय नौदल जहाजाचे लोकेशन ट्रॅक करण्याा प्रयत्न करत असून बचावाची तयारी सुरु करण्यात आली आहे.
सध्या या घटनेमुळे जागतिक व्यापार धोक्यात आला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. येमेनमध्ये आधीच हौथी बंडखोरांचे हल्ले वाढत चालले आहे. अशा परिस्थिती सोमालिया डाकूंच्या परण्याने लाल समुद्रातून जाणारा व्यापारी मार्गावर मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक व्यापारात अडथला निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे इराणनेही होर्मुझ बंद केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल आणि वायू पुरवठा कमी पडत चालला आहे. ज्याचा इंधन दरांवर परिणाम होत आहे.






