(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचा १४ कलमी प्रस्ताव धुडकावला आहे. यावर इराणच्या लष्कराचे उपप्रमुख मोहम्मद जाफरी आसदी यांनी तीव्र टीका केली आहे. अमेरिका कोणत्याही करारावर ठाम राहता नाही किंवा त्यांच्या शब्दाला किंमत देत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच ट्रम्प यांच्या लष्करा कारवाईच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देत, इराण चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे जाफरी यांनी म्हटले. आमचे सैन्य हाय अलर्टवर असल्याचा इशारा त्यांनी दिला.
पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणने मे २०२६ च्या सुरुवातीलाच १४ अटींचा प्रस्ताव मांडला आहे. परंतु या अटी अमेरिकेला अमान्य असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.
सध्या दोन्ही देशांमध्ये थेट संघर्ष सुरु नसला तरी ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देशांच्या सीमांवर आणि राजनैतिक स्तरावर अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाची चाहूल लागली आहेत. ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. तसेच इराणवर कडक निर्बंध लादले जाण्याचीही शक्यता आहे.
दोन्ही देशांतील संघर्ष पुन्हा पेटल्यास स्ट्रेट ऑफ होर्मुझचा मार्ग बंद होऊ शकतो. परिणामी जागतिक बाजारपेठेत तेल आणि वायू पुरवठ्यात अडथळा निर्माण होईल. ज्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणा होऊ शकतो.
Ans: इराणने अमेरिकेला त्यांचे सैन्य युद्धासाठी सज्ज असल्याचे म्हटले. कोणत्याही लष्करी कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.
Ans: ट्रम्प यांच्या मते, इराणकडे अण्वस्त्रे असणे हा जागतिक शांततेसाठी मुख्य करुन इस्रायल, युरोपसाठी मोठा धोका आहे. यामुळे इराणला कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे बाळगू दिली जाणार नाहीत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.






