Chandrapur News: चंद्रपूर-ब्रह्मपुरीत उष्णतेचा कहर; तापमान 47 अंशांच्या पार, नागरिक हैराण
Bandra Demolition : वांद्र्यात तोडक कारवाईचा चौथा दिवस; 90% झोपड्या जमीनदोस्त, आज पोलीस हायअलर्टवर
भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला होता. हवामान विभागाने २० ते २४ मेपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा आधीच दिला होता. बुधवारी आणि गुरुवारी चंद्रपूर व ब्रह्मपुरी या दोन्ही हवामान केंद्रांवर ४६ अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले. या काळात नागरिकांना बाहेर पडताना मोठा त्रास सहन करावा लागला, तर शहरातील रस्ते दुपारी दिवसांपासून पूर्णपणे सुनसान राहिले. (फोटो सौजन्य – Pinterest)
वाढत्या उष्णतेमुळे जनजीवनावर आणि आरोग्यावरही परिणाम होत आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच जिल्ह्यातील नगारिक त्रस्त झाले आहे. तामपान वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन कारावे लागत आहे.
मागील महिनाभरापासून चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेने नागरिकांचे जीवन कठीण केले आहे. गेल्या दोन दिवसात तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पातळीवर पोहोचल्यामुळे एसी आणि कूलरही प्रभावी काम करीत नाही. परिणामी नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसभर थंड पेये घेणे, घरातच राहणे आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे यासारख्या उपाययोजना नागरिकांसाठी आवश्यक ठरल्या आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे.
Maharashtra Weather: उकाड्यानंतर पावसाची हजेरी; मुंबई उपनगरात रिमझिम पावसाने वातावरण आल्हाददायक
दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान हे चंद्रपूरकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शासन प्रशासनाने वाढत्या तापमानासाठी शासनाकडून शाश्वत उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांकडून बोलेले जात आहे. शहरात व जिल्ह्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट क्राँक्रेटच्या रस्त्याच्याकडेला वृक्षांचा अभाव आहे. त्यामुळे प्रवास करताना अनेकांना उष्णतेच्या झळा सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देऊन सिमेंट क्राँक्रेट रस्त्यांच्याकडेला झाडे लावण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू अशी लागलेली आहे.






