Qatar Gas Explosion : कतारच्या LNG हबवरील स्फोटात १२ भारतीयांसह १३ जणांचा बळी; अनेक गंभीर जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Quatar Gas Explosion : कतार हादरलं! सर्वात मोठ्या गॅस हबवर भीषण स्फोट; ५० हून अधिक जखमी, १८ बेपत्ता
दोहा येथे भारतीय दूतावासाने या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या गंभीर दुर्घनेबाबत चिंताही व्यक्त केली आहे. भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण स्फोटात अनेक लोक जखमी झाले असून काही कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या भारतीयांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
कतारच्या अधिकाऱ्यांनी, या अपघाताचे वर्णन तांत्रिक दुर्घटना म्हणून केले आहे. परंतु मुख्य कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या या दुर्घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून मध्यपूर्वेत सुरु असलेल्या इराण संघर्षाचा कतारच्या रास लाफान केंद्राला आणि पायाभूत उर्जा सुविधांना फटका बसला आहे. यामुळे हा स्फोट नक्की कशामुळे झाले हे चौकशी झाल्यावरच स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले.
२१ जूनच्या संध्याकाळ रास लाफान इंडियस्ट्रियल सिटी येथे बरजान गॅस पुरवठा केंद्रावर अचानक स्फोट झाला. या स्फोटावेळी केंद्रावर बंद असलेल्या सुविधा पुन्हा सुरु करण्याचे कार्य सुरु होते. यावेळी अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण परिसरात आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणली.
कतार हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायू निर्यातदारांपैकी एक आहे. यामुळे कतारच्या सर्वात महत्त्वाच्या गॅस उत्पादन केंद्रावर झालेल्या या दुर्घटनेने देशांतर्गत आणि जागतिक उर्जा पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. यामुळे गॅस उत्पादन आणि त्याच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कतारचे उर्जा मंत्री साद शेरिदा अल-काबी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच घटनेचा तपास सुरु करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
Qatari authorities have confirmed that 12 Indian nationals have unfortunately passed away in the Ras Laffan incident yesterday night. We extend our deepest condolences to the bereaved families and prayers for the departed souls. Qatari authorities have also confirmed that all… — India in Qatar (@IndEmbDoha) June 22, 2026






