जगाचं लक्ष भारत-पाकिस्तानकडे असतानाच पुतीन यांनी साधला डाव; युक्रेनच्या ताब्यातील मोठा भाग केला काबीज (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: पहलगाम हल्ल्याने केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. याच वेळी संपूर्ण जगाचे लक्ष भारत-पाक वादावर असताना दुसरीकडे रशियाने मोठे लष्करी यश मिळवले आहे. रशियाने कुर्स्क प्रदेशावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. याची पुष्टी स्वत:हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमर पुतिन यांनी केली आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून रशिया युक्रेनच्या कुर्स्क प्रदेशावर नियंत्रणा मिळवण्याच्या प्रयत्नात होता. यामध्ये आता रशियाला यश मिळाले आहे. गेल्या वर्षी 2024 च्या ऑगस्टमध्ये युक्रेनच्या सैन्याने रशियन प्रदेश कुर्स्कचा बरासचा भाग ताब्यात घेतला होता. यामुळे हा भाग परत मिळवण्यासाठी रशियाने प्रयत्न करत होता. अखेर रशियाला यामध्ये यश मिळाले आहे. रशियाने रणनीतीकदृष्ट्या कुर्स्कच्या संपूर्ण प्रदेशाला वेढा घालत युक्रेनच्या सैन्यावर दबाव टाकत राहिला. अनेक महिन्यांच्या लष्करी कारवाया नंतर रशिया कुर्स्कला पुन्हा युक्रेनच्या ताब्यातून मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमर पुतिन यांनी कुर्स्कवरील य़ा विजयाचे वर्णन रशियाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठीचे एक महत्वाते पाउल असे म्हटले आहे. पुतिन यांनी म्हटले आहे की, रशियन सैनिकांनी धैर्य आणि धोरणात्मक कौशल्यावर विजय मिळवला आहे. कुर्स्क प्रदेश आता रशियाच्या ताब्यात आहे. हे रशियाच्या लष्करी धोरणाचे आणि दीर्घकाळ संबंधाचे परिणाम आहेत. पुतिन यांच्या घोषणेनंचर रशियामध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. देशभरात उत्सव साजरा केला जात आहे.
रशियाच्या या विजयाचे धोरणात्मक दृष्टीकोनातून महत्व खूप मोठे आहे. कुर्स्क हा प्रदेश भौगोलिक दृष्ट्या रशियासाठी अधिक महत्वाच आहे. कुर्स्क रशियासाठी एक महत्वपूर्ण लष्करी तळ आहे. या प्रदेशावरी पुन्हा नियंत्रणामुळे रशियाची पश्चिम सीमेवरी पकड पुन्हा मजबूत होणार आहे आहे. तसेच युक्रेनच्या इतर लष्करी कारनवाय देखील रशियाला थांबवण्यात मदत होणार आहे. यामुळे तज्ज्ञांच्या मते, रशियासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे.
सध्या रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचे कोणतेही चिन्ह नाही. कुर्स्कवर रशियाने नियंत्रण मिळवले आहे. तसेच दोन्ही देशांतील संघर्ष सुरुच आहे. रशियासाठी हा एक मोठा विजय आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाचे स्थान पुन्हा मजबूत होईल. आता केवळ एकच प्रश्न उपस्थित होतो की, रशियाचे पुढील पाऊल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.