सात महिन्यांच्या चिमुकल्याचा काय गुन्हा? इस्रायली गोळीबारात बाळाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी; जगभरात संतापाची लाट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पॅलेस्टाईन वृत्तसंस्था वाफाने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी(०५ जून) संध्याकाळी हेब्रॉनमधील केल रुमैदा भागात ही घटना घडली. बाळाची ओळख सॅम फहद अबू हैकल अशी करण्यात आली आहे. सॅम चे कुटुंब आपल्या नातेवाईकांना भेटायला जात असताना इस्रायली सैनिकांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. ज्यामध्ये दोन्ही पालक गंभीर जखमी झाले असून चिमुरड्याचा बळी गेला आहे.
बाळाचे वडील फहद अबू हॅकल हे बेथलेहेम विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांच्या हाताला गोळी लागली आहे. त्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, एक गोळी कारच्या विंडशील्डमधून आतमध्ये शिरली आणि त्यांच्या हाताला लागली. नंतर त्यांच्या मुलाला आणि पत्नीला लागली. हृदद्रावक म्हणजे पोटच्या गोळ्याचा आईच्या कुशीत असताना मृत्यू झाला. गोळी थेट चिमुकल्याच्या चेहऱ्याच्या आरपार गेली. आईच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली असून प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेवेळी सॅमची आजी देखील कारमध्ये उपस्थित होती. त्यांनी सांगितले की इस्रायली सैन्याच्याच्या गाड्या दिसताच कुटुंबाने कार थांबवली होती. पण तहीरी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांनी संतप्त होऊन म्हटले की, सात महिन्यांच्या बाळाचा उद्ध्वस्त चेहरा पाहणे अत्यंत भंयकर होते. जगातील कोणते सैन्य असे करते?
दरम्यान इस्रायच्या डिफेन्स फोर्सने चौकशीत सामान्य लोक जखमी झाल्याचे मान्य केले. सैनिकांनी कार वेगाने येत असल्याच्या संशयावरुन कारवाई केली. केवळ एकच गोळी झाडण्यात आले असल्याचे लष्कराने म्हटले. तसेच घटनेचा तपास सुरु असल्याचेही सांगितले.
सध्या इस्रायच्या या कृत्यावर जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा मानवाधिकार संघटनांनी तीव्र विरोध केला असून याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे.
Earlier today, during operational activity in the area of Hebron, IDF soldiers perceived a vehicle accelerating toward them. An IDF soldier responded with single shots toward the vehicle. As a result, three Palestinians were injured and evacuated for medical treatment. An… — Israel Defense Forces (@IDF) June 5, 2026






