Trump AI Adviser : ट्रम्प सरकारला मोठा धक्का! भारतीय वंशाचे AI सल्लागार श्रीराम कृष्णन पद सोडणार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कृष्ण यांनी सांगितले की, तंत्रज्ञान धोरणावर एक प्रभावी स्वतंत्र्य संस्था उभारण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. जून महिन्याच्या अखेरीस ते आपले पद सोडतील. याबाबत कोणतेही अधिकृत कारण त्यांनी जाहीर केले नाही. परंतु एआय क्षेत्रातील अमेरिकेसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी ते काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, अमेरिकन जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे भागय होते. मात्र, त्यांच्या जाण्याने अमेरिकेच्या एआय धोरणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🇺🇸🚀 SOME NEWS: I’ll be leaving my role at the White House at the end of this month. After a break I’ll be working on helping tackle some of the large challenges facing America on AI (more on that later). It is hard to express how big a privilege it has been to serve the… — Sriram Krishnan (@sriramk) June 6, 2026
श्रीराम कृष्णन हे चेन्नईच्या तामिनाडूचे रहिवासी आहेत. त्यांनी एसआरएम विद्यापीठातून बी. टेक पदवी मिळवली असून ते Andreessen Horotwitz या प्रतिष्ठित व्हेंचर कॅपिटल कंपनीचे जनरल पार्टनर होते. याशिवाय त्यांनी मायक्रोसॉप्ट, ट्विटर, याहू, फेसबुक आणि स्नॅप यांसारख्या टेक कंपन्यांचे उत्पादन संघांचे नेृत्त्व केले आहे.
गेल्या १८ महिन्यांपासून ते अमेरिकेच्या व्हाईट हाउस एआय अँड क्रिप्टो झार डेव्हिड सॅक्स यांच्यासोबत कार्य करत होते. त्यांनी अमेरिकन एआय अॅक्शन प्लॅन तयार करण्यात, एआय भागीदारी विकसित करण्यात आणि राष्ट्रीय एआय धोरण आराखडा कार्यकारी आदेशात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच त्यांनी फ्रान्स आणि भारतातील एआय परिषदांचे, यूके आणि मध्यपूर्वेतील राजकीय दौऱ्यांचे अमेरिकेचे एआय सल्लागार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे.






