(फोटो सौजन्य: Chatgpt)
कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी गूड न्यूज! Poultry व्यवसायातील कमाई वाढणार; बनणार सर्वात फायदेशीर बिझनेस
नवीन व्यवस्था टप्प्याटप्प्याने राज्यभर लागू केली जाणार आहे. या निर्णयामुळे रेशन वितरणाची प्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित आणि अचूक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारी निर्णयानुसार, आता नव्याने जे लोकं रेशन कार्डसाठी अर्ज करतील त्या सर्वांना थेट स्मार्ट रेशन कार्ड दिले जाणार आहे. सध्या वापरात असलेली कागदी रेशन कार्डेही टप्प्याटप्प्याने स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरित करण्यात येईल. या प्रक्रियेमुळे राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांना हा बदल करुन मिळणार आहे.
नव्या डिजीटल प्रणालीवर चालणाऱ्या रेशनकार्डमध्ये खास आहे तो म्हणजे क्यूआर कोड. नवीन स्मार्ट रेशन कार्डावर प्रत्येक लाभार्थ्यासाठी स्वतंत्र क्यूआर कोड देण्यात येणार आहे. आपण रेशन दुकानात जाताच हा कोड स्कॅन केला की लाभार्थ्याची संपूर्ण माहिती काही क्षणांत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ओळख पडताळणी आणि तपासणी अधिक सुलभ आणि अचूक करता येणार आहे. तसेच प्रत्येक व्यवहाराची नोंद आता डिजिटल स्वरुपात ठेवली जाणार आहे. यामुळे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार आहे. याच बरोबर आणखी मोठा फायदा तो म्हणजे क्युआर कोड असल्यामुळे आपल्याला पाहिजे तेव्हा मोबाईलचा वापर करुन रेशन कार्ड संबंधित माहिती मिळवू शकतो. त्यामुळे स्वतःचा डेटा तपासणं, वितरणाबाबत सगळा तपशील जाणून घेईल आणि काही अडचण असल्यास त्यासाठी तक्रार करणं देखील सोपं आहे.
पूर्वीचं रेशनकार्ड हे कागदी पुस्तकी स्वरुपात होतं. आता डिजीटल इंडियाच्या युगात स्मार्ट रेशन कार्ड प्लास्टिकपासून तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे हे कागदी कार्डांपेक्षा अधिक टिकाऊ असणार आहेत. कागदावेळी होणाऱ्या समस्या फाटणे, भिजणे किंवा खराब होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. शिवाय डिजिटल पडताळणीमुळे रेशन वितरणासाठी लागणारा वेळही कमी होण्याची शक्यता आहे.
या सगळ्या नवीन प्रणालीमुळे सगळा बनाव बनावट रेशन कार्ड ओळखणे अधिक सोपे होणार आहे. डिजिटल पडताळणी आणि ऑनलाइन नोंदीच्या माध्यमातून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच सरकारी योजनांचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.






