Thailand Visa Rules : थायलंडचा भारतीयांना मोठा दणका! ६० दिवसांची Visa Free Entry बंद; 'हा' नवा नियम लागू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
थायलंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; धावत्या ट्रेनवर कोसळली भलीमोठी क्रेन, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
थायलंड सरकाने घेतलेल्या नव्या नियमानुसार, भारतीय पर्यटकांना आता थायलंडमध्ये केवळ १५ दिवसांसाठीच मुक्काम करता येणार आहे. यापूर्वी भारतासह ९३ देशांतील नागरिकांना विनाव्हिसा २ महिने राहण्याची सवलत होती. मात्र, आता प्रवाशांना विमानतळावर उतरल्यावर व्हिसा घ्यावा लागेल. तसेच प्रवासापूर्वी इ-व्हिसासाठीही अर्ज करावा लागले. यासाठी पर्यटकांना सुमारे २५०० थाई भट म्हणजे अंदाजे ५,८०० रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे अचानक ट्रिप प्लॅन करणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
कोरोना माहीमारीनंतर देशातील पर्यटनाला गती देण्यासाठी थायलंडने व्हिसा नियमात सवलती दिल्या होत्या. परंतु गेल्या काही महिन्यात पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन, व्हिसा संपल्यानंतरही बेकायदेशीर वास्तव, ऑनलाईन स्कॅम आणि पर्यटनांवरील गैरवर्तनाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
विशेष करुन सोशल मीडियावर काही पर्यटकांचे मंदिरामधील हुल्लडबाजीचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने थाई सरकारने कडक पावले उचलली आहेत. यामुळे सीमा सुरक्षेचा हवाला देत सरकारने व्हिसा नियम अत्यंत कडक केले आहेत. सध्या केवळ जुन्या नियमांनुसार, थायलंडमध्ये दाखल झालेल्यांना त्यांच्या ठरलेल्या मुदतीपर्यंत राहण्याची सूट देण्यात आली आहे.
नव्या नियमांमुळे प्रवाशांचा खर्च आणि कागदपत्रांची डोकेदुखी वाढेल. यामुळे भारतीय पर्यटक मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका किंवा बालीसारख्या सोपे व्हिसो नियम असलेल्या देशांना प्राधान्य देतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
थायलंड हादरलं! रेल्वेनंतर महामार्गावर कोसळली क्रेन, गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर, थरारक VIDEO






