(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणशी सुरु असलेल्या तणावाच्या काळात ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प हातात ताशचे पत्ते घेऊन उभे आहेत. या ताशच्या पत्त्यांवर WILD असे लिहिलेले आहे. तर फोटो शेअर करताना ट्रम्प यांनी माझ्याकडे सर्व पत्ते आहेत (I Have All Cards) असे कॅप्शन लिहिले आहे. तज्ज्ञांच्या मते, हा एक जागतिक कूटनीतीचा खेळ आहे.
तज्ज्ञांच्या मते, इराणशी सुरु असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिका (America) मजबूत स्थितीत असून सर्व सुत्रे ट्रम्प यांच्या हातात आहे, असे ट्रम्प यांना यातून सुचवायचे आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासाची सध्याच्या घडामोडींशी तुलना केली आहे. यामध्ये वॉशिंग्टन येथील मेमोरियल रिफ्लेक्टिंग पूलचे फोटो आहेत. तसेच त्यांनी ओबामांच्या काळातील पूलाचा जो अत्यंत अस्वच्छ आणि दुर्लक्षित केल्याचे दाखवण्यात आले आहे, तर ट्रम्प येत्या काळात तो पूल स्वच्छ करुन चकाचक झालेला फोटो दाखवण्यात आला आहे. माऊंट रशमोर या ऐतिहासिक स्मारकाचाही फोटो ट्रम्प यांनी शेअर केला आहे. सध्या या पोस्टमुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे ट्रम्प यांनी आपल्या मित्र राष्ट्रांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इराण युद्धात (Iran War) अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने ट्रम्प नाटो देशांवर संतप्त आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी जर्मनी(Germany)चे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्या टीकेनंतर जर्मनीतून ५००० सैन्य परत बोलावले आहे.
सध्या त्यांच्या या पोस्टमुळे जागतिक स्तरावर वेगळ्याच चर्चांणा उधाण आहे. एकीकडे इराणसोबत सुरु असलेला संघर्ष आणि दुसरीकडे युरोपीय देशांशी बिघडलेले संबंधाच्या पार्श्वभूमीवरच ट्रम्प यांनी ताश पोस्ट केली आहे.






