Business

गुंतवणूकदार सावधान! ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात 'भूकंप' येणार?

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या परस्पर टॅरिफ धोरणाला रद्द केल्याने जागतिक व्यापार धोरणात मोठी उलथापालथ झाली आहे. पण ट्रम्प यांनी 10% सार्वत्रिक शुल्काची घोषणा करत आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे.

Ankita Karangutkar
  • ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाने काय घेतला निर्णय?
  • भारताच्या 50 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक निर्यातीला दिलासा?
  • सोना-चांदीच्या दरावर होणार मोठा परिणाम

US Supreme Court Decision on Trump Tariffs: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'परस्पर शुल्क' (Reciprocal Tariffs) धोरणाला चाप लावत रद्द करण्याचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हा निर्णय  येताच काही तासांतच अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या आक्रमक धोरणांचा पुनरुच्चार करत सर्व देशांवर १० टक्के जागतिक शुल्क (Universal Global Tariff) लादण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. या निर्णयामुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी या घडामोडींचा शेअर बाजारासह जागतिक बाजारपेठांवरही परिणाम होणार असल्याचं बोललं जातं आहे.

या घडामोडींचे पडसाद केवळ शेअर बाजारावरच नव्हे, तर सोने आणि चांदीच्या किमतींवरही उमटणार आहेत. जागतिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे 'सुरक्षित गुंतवणूक' म्हणून पाहतात, त्यामुळे सोन्याच्या दरात उसळी येऊ शकते. तसेच, प्रशासनाने आतापर्यंत वसूल केलेल्या सुमारे १७५ अब्ज डॉलर्सच्या (सुमारे १४.५ लाख कोटी रुपये) रिफंडबाबत मोठी कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी हा परतावा देण्यास विरोध दर्शवला असून आता ही लढाई न्यायालयात ५ वर्षे चालेल असे संकेत आहेत. त्यामुळे आता व्यापार क्षेत्रातील संभ्रम अधिकच वाढला आहे. येणारा आठवडा जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं बोललं जात आहे.

शेअर बाजारावर काय परिणाम होऊ शकतो?

SMC ग्लोबल सिक्युरिटीजच्या सीनियर रिसर्च एनालिस्ट सीमा श्रीवास्तव यांनी 'मिंट'च्या रिपोर्टनुसार स्पष्ट केलं की, सोमवारी शेअर बाजारात वाढ होऊ शकते. ट्रम्प यांच्या जागतिक टॅरिफ रद्द करण्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा भारतीय निर्यातदारांसाठी एक मोठा विजय आहे, जे इंटरनेशनल इमरजेंसी इकोनॉमिक पावर्स एक्ट (IEEPA) अंतर्गत लादलेल्या टॅरिफविरोधात संघर्ष करत होते. या शुल्कांमुळे ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय निर्यातीवर परिणाम झाला होता. विशेषतः वस्त्रोद्योग आणि रत्ने-दागिने यांसारख्या मजूर-केंद्रित क्षेत्रांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. उत्पादन खर्च वाढणं, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घट होणं आणि ऑर्डर्समध्ये अनिश्चितता निर्माण झाल्यामुळे या क्षेत्रांवर ताण वाढला होता. या शुल्कांमध्ये सवलत किंवा धोरणात्मक बदल झाल्यास निर्यात वाढीस चालना मिळू शकते, ज्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होऊन बाजारात तेजीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

मीडिया अहवालात त्यांनी हे स्पष्ट केलं की, या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार चौकटीअंतर्गत ठरवण्यात आलेला 18 टक्के परस्पर (रेसिप्रोकल) टॅरिफ रद्द झाला आहे. याचा अर्थ असा की अमेरिकेकडे जाणाऱ्या भारताच्या सुमारे 55 टक्के निर्यातीवर आता केवळ 10 टक्के टॅरिफ आकारले जाईल. मात्र, SS वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा यांनी स्पष्ट केले की अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा परिणाम वेगवेगळ्या कायदेशीर तरतुदींनुसार लावण्यात आलेल्या सेक्टर स्पेसिफिक टॅरिफवर होणार नाही. स्टील, अॅल्युमिनियम, ऑटोमोबाइल, सेमीकंडक्टर आणि इतर धोरणात्मक उत्पादनांवरील टॅरिफ अद्याप कायम आहे.

 GIFT Nifty 50 वर काय परिणाम?

भारतीय शेअर बाजारात गॅप-अप ओपनिंगची शक्यता व्यक्त करताना सेबी-नोंदणीकृत फंडामेंटल इक्विटी विश्लेषक अविनाश गोरक्षकर यांनी 'मिंट'च्या अहवालात सांगितले की संबंधित घडामोडी घडल्या तेव्हा भारतीय शेअर बाजार बंद होता, मात्र GIFT Nifty सुरू होता. सामान्यतः GIFT Nifty निर्देशांक आणि NIFTY 50 निर्देशांत थोड्या फरकाने बंद होतात. पण शुक्रवारी Nifty 50 निर्देशांक 25,571 वर बंद झाला, तर 26 फेब्रुवारी 2026 च्या एक्सपायरीसाठी GIFT Nifty 50 फ्युचर्स 25,764 वर बंद झाला. म्हणजेच Niftyपेक्षा सुमारे 200 अंकांनी जास्त हा आकडा होता. त्यामुळे सोमवारी BSE Sensex 500 अंकांहून अधिक वाढीने उघडला तरी आश्चर्य वाटणार नाही.

Raigad News: ४७ गावं, ३३ आदिवासी वाड्या तहानलेल्या! उमटे धरणाच्या गाळमुक्तीसाठी संघर्ष ग्रुप आक्रमक, १३ कंपन्यांना दिले निवेदन

Supriya Sule CM News : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? राऊत म्हणाले, त्यांच्या शपथविधीला मी जाणार! राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप?

Baba Aparajith Retirement: CSK च्या 'या' खेळाडूचा क्रिकेटला रामराम; IPL 2027 ऑक्शनपूर्वी घेतला मोठा निर्णय

जुन्नर तालुक्यात बिबट्याचा भरदिवसा हल्ला; एका महिलेचा मृत्यू तर दुसरी जखमी

शत्रूसोबत पण असं घडायला नको! क्रीजपासून लांब राहून देखील फलंदाज OUT! विचित्र घटनेचा Video Viral