रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा 
राजकारण

पुण्याचं पालकत्व फडणवीसांकडे दिलं तर वाटोळं होईल! रोहित पवारांनी सुनावलं, वाढती गुन्हेगारी गृहमंत्र्यांचं अपयश?

Rohit Pawar on Devendra Fadnavis : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून पालकमंत्रिपदाचा वाद पेटला आहे. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पुण्याचं पालकत्व देण्याची मागणी केली असताना रोहित पवारांनी मात्र याला विरोध केला.

Vivek
  • पुण्याचं पालकत्व फडणवीसांकडे देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी

  • फडणवीसांकडे पालकत्व दिल्यास पुण्याचं वाटोळं होईल, रोहित पवारांचा ठाम विरोध

  • सुनेत्रा पवारांना ताकद द्या, रोहित पवारांची मागणी

Rohit Pawar on Devendra Fadnavis : पुण्यातील शिवाजीनगर भागात काल (बुधवार, 25 नोव्हेंबर) झालेल्या गोळीबार आणि गंभीर मारहाणीच्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल अनेक वर्षांपासून चिंता व्यक्त होत असतानाच आत थेट न्यायालयाच्या आवारातदेखील गुन्हेगारी घटना घडू लागला आहेत. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून राजकीय वर्तुळात आता चांगलीच जुंपली असल्याचं दिसत आहे.

पुणे शहरात एकापाठोपाठ घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे पुण्याच्या पालकमंत्रिपदावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचं पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं, अशी मागणी केली होती. मात्र, त्यांच्याच पक्षातील आमदार रोहित पवार यांनी यापेक्षा वेगळी भूमिका मांडली आहे.

रोहित पवार यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना पुण्याचं पालकमंत्रिपद देण्याच्या मागणीला विरोध करत रोहित पवार यांनी 'फडणवीसांकडे पालकत्व दिल्यास पुण्याचं वाटोळं होईल,' अश्या शब्दांत घणाघात केला आहे.

फडणवीसांकडे पालकत्व दिल्यास पुण्याचं वाटोळं होईल!

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्याच्या गृहखात्याचं अपयश जबाबदार असल्याचं ते म्हणाले.

"मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत. त्यांच्या खात्याला गुन्हेगारी रोखण्यात यश येत नसेल, तर त्यांनी पुण्याचं पालकत्व घेतल्यास शहराचं वाटोळं होईल," असा टोला रोहित पवार यांनी लगावला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या मागणीपेक्षा रोहित पवारांची भूमिका वेगळी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सुनेत्रा पवारांना ताकद द्या, रोहित पवारांची मागणी

पुण्याला सध्या अजितदादांसारखा पालकमंत्री मिळत नसल्याचंही रोहित पवार म्हणाले. अजित पवार यांचा प्रशासनावर वचक होता. त्यांच्यासारखं काम करणं इतरांना शक्य होत नसल्याचं त्यांनी नमूद केलं.

"सुनेत्रा पवार यांच्याकडे पुण्याची जबाबदारी असेल तर त्यांना पुरेशी ताकद दिली पाहिजे. त्यांच्या आमदार आणि खासदारांनीही त्यांना मदत करायला हवी. त्यांना काम करणं शक्य नसेल तर पुण्यासाठी एखादा सक्षम आणि कठोर पालकमंत्री नेमावा," अशी मागणीही त्यांनी केली.

पुण्याचे पोलीस आयुक्त बदलण्याची मागणी

पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. पोलीस आयुक्त सामान्य पुणेकरांचं किंवा विविध पक्षांच्या नेत्यांचं ऐकत नसल्याचा आरोप त्यांनी केला. ते केवळ देवेंद्र फडणवीस यांचंच ऐकतात, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे पुण्याला कार्यक्षम पोलीस आयुक्त देण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

एकीकडे सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पुण्याच्या पालकत्वाची जबाबदारी देण्याची मागणी केली, तर दुसरीकडे रोहित पवार यांनी त्यालाच विरोध केला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या भूमिकांवर राजकीय चर्चा सुरू झाली आहे. आता पुण्यातील आणि एकंदरीतच राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत सरकार काय निर्णय घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुण्यात गावठी दारूचा धंदा उघड! दोन महिलांसह तिघांना अटक; 37 लिटर दारू जप्त

FatakPay Ugro Capital Partnership : कोणत्याही तारणाशिवाय त्वरित मिळणार कर्ज! फटाकपे आणि यूग्रो कॅपिटलची नवी भागीदारी; असा मिळवा लाभ

Kim Jong Un : संवाद संपला, आता थेट अणुयुद्धाची तयारी? उत्तर कोरियाच्या नव्या पावलाने अमेरिकेची चिंता वाढली

Mental health: सतत ओव्हरथिंकिंग होत असेल तर काय करावे? मन शांत ठेवण्यासाठी फॉलो करा या ७ खास टिप्स!

MI Emirates : आगामी हंगामासाठी उषा इंटरनॅशनलने 'एमआय एमिरेट्स' सोबतची भागीदारी वाढवली