कारच्या टायरमध्ये नायट्रोजन भरल्याने खरंच मायलेज वाढतं? समोर आलं खरं कारण, जाणून घ्या ‘थंड’ गॅसचं सत्य (फोटो सौजन्य-ChatGPT)
अनेक पेट्रोल पंप आणि सर्व्हिस सेंटरवर कारच्या टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरण्याचा सल्ला दिला जातो. दावा असा केला जातो की नायट्रोजनमुळे टायर थंड राहतात, हवा कमी निघते आणि त्यामुळे कारचे मायलेज वाढते. मात्र, या दाव्यामागचे सत्य काय आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, नायट्रोजन गॅसमध्ये ओलावा कमी असतो आणि तिचा दाब (Pressure) सामान्य हवेपेक्षा अधिक स्थिर राहतो. त्यामुळे टायरमधील प्रेशर जास्त काळ कायम राहण्यास मदत होऊ शकते. योग्य टायर प्रेशर असल्यास वाहनाचे इंधन कार्यक्षमतेने वापरले जाते, ज्याचा थोडाफार सकारात्मक परिणाम मायलेजवर दिसू शकतो.
किती लिटर पेट्रोल पितो तुमच्या कारचा AC एका तासात, जाणून घ्या
तथापि, नायट्रोजन भरल्याने मायलेजमध्ये मोठी वाढ होते, असा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. सामान्य हवेतील सुमारे 78% भाग हा आधीच नायट्रोजनचा असतो. त्यामुळे नियमितपणे टायर प्रेशर तपासून योग्य पातळी राखणे हेच मायलेज वाढवण्यासाठी अधिक प्रभावी मानले जाते. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास, हायवे ड्रायव्हिंग किंवा जास्त तापमानात वाहन चालवणाऱ्यांसाठी नायट्रोजन फायदेशीर ठरू शकते. पण रोजच्या वापरासाठी सामान्य हवा देखील पुरेशी असल्याचे वाहन तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे नायट्रोजन हा ‘जादुई उपाय’ नसून, योग्य टायर मेंटेनन्स अधिक महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्यात कारच्या टायरमध्ये नायट्रोजन वायू भरल्याने केवळ टायरचे आयुष्यच वाढत नाही, तर तीव्र उष्णतेतही टायरचे तापमान कमी राहते.
सत्य हे आहे की, उन्हाळ्यात केवळ तापमान कमी ठेवण्यासाठी कारच्या टायरमध्ये नायट्रोजनचा वापर केला जातो, हे पूर्णपणे खरे नाही.
वातावरणातील नायट्रोजनचे प्रमाण ७८% पर्यंत असते. त्यामुळे, जेव्हा कारमध्ये सामान्य हवा भरली जाते, तेव्हा त्यातही ७८% पर्यंत नायट्रोजन असतो. अशा परिस्थितीत, उर्वरित २२ टक्क्यांची पूर्तता करण्यासाठी लोक टायरमध्ये स्वतंत्रपणे नायट्रोजन वायू भरतात.
कारच्या टायरमध्ये नायट्रोजन भरल्याने कोणताही फायदा होत नाही. याचे कारण असे की, उत्पादक उच्च-गुणवत्तेचे टायर बनवतात, त्यामुळे त्यातील हवा सहजासहजी बाहेर पडत नाही.






