फोटो सौजन्य: Pinterest
Mahindra कडून कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Mahindra XUV 3XO ही कार ऑफर केली जाते. ही SUV अनेक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून कार घरी आणू इच्छित असाल, तर दरमहा किती EMI भरावा लागेल, याची माहिती जाणून घेऊया.
‘या’ प्रीमियम Cars च्या किमतीत भलीमोठी वाढ! 5 लाख रुपयांपर्यंत महाग झाल्या कार
महिंद्राकडून XUV 3XO चा बेस व्हेरिएंट MX1 सुमारे 7.54 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध आहे. राजधानी दिल्लीत ही कार खरेदी केल्यास अंदाजे 53 हजार रुपये RTO आणि सुमारे 40 हजार रुपये इन्शुरन्स खर्च येतो. त्यामुळे या गाडीची ऑन-रोड किंमत सुमारे 8.47 लाख रुपये होते.
जर तुम्ही MX1 व्हेरिएंट घेतला आणि 2 लाख रुपये डाउन पेमेंट केली, तर उर्वरित सुमारे 6.47 लाख रुपये बँकेकडून फायनान्स करावे लागतील. जर बँक 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी कर्ज देते, तर दरमहा सुमारे 10,414 रुपयांचा EMI भरावा लागेल.
Hybrid सेगमेंटमध्ये ‘या’ कंपनीची जोरदार एंट्री! भारतात एकापेक्षा एक दमदार कार लाँच होण्याच्या तयारीत
7 वर्षांच्या कालावधीत 10,414 रुपयांची EMI भरल्यास सुमारे 2.28 लाख रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. अशा प्रकारे एक्स-शोरूम, ऑन-रोड किंमत आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 10.74 लाख रुपये होते.
कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Mahindra XUV 3XO चा थेट मुकाबला Renault Kiger, Maruti Brezza, Tata Nexon, Kia Sonet, Hyundai Venue आणि Nissan Magnite यांसारख्या SUV सोबत होतो.






