फोटो सौजन्य: @MGMotorIn (X.com)
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढताना दिसत आहे. त्यात नवीन कार खरेदीदार इंधनावर चालणाऱ्या कार्सपेक्षा EV खरेदीला जास्त प्राधान्य देत असतात. तसेच मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या बेस्ट फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे.
मार्केटमध्ये आतापर्यंत सर्वात लोकप्रिय ठरलेली इलेक्ट्रिक कार म्हणजे MG Windsor EV. या कारमुळे तर MG Motors चे नशीबच पालटले आहे. या कारच्या लाँच नंतर तर कंपनीच्या अन्य कार्सची विक्री देखील वाढली आहे. आता कंपनी एमजी विंडसर ईव्हीचा नवा व्हेरियंट मार्केटमध्ये आणणार आहे.
JSW MG Motor India इंडिया भारतात आपला पोर्टफोलिओ वाढवणार आहे. कंपनी लवकरच भारतात नवीन एमजी विंडसर लाँच करणार आहे, जी भारतातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे. कंपनी त्यात अनेक मोठे अपडेट्स देणार आहे. ही कार MG Windsor PRO या नावाने लाँच होईल.
परफॉर्मन्सच्या बाबतीत भल्याभल्यांना मागे सोडतील ‘या’ Powerful Bikes, किंमत 3 लाखांपेक्षा कमी
MG Windsor Pro मध्ये अनेक मोठे बदल दिसून येतील. मोठ्या बॅटरीसोबतच, त्यात नवीन ADAS फीचर्स देखील दिसतील. या कारमध्ये कोणते नवीन फीचर्स दिसतील त्याबद्दल जाणून घेऊयात.
लोकांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेऊन MG Windsor Pro डिझाइन करण्यात आली आहे. याच्या नवीन मॉडेलमध्ये प्रगत तंत्रज्ञान, उत्तम सुरक्षा, प्रीमियम इंटिरिअर, सुविधा, स्टाइल आणि नवीन बॅटरी पॅक प्रदान केला जाणार आहे.
विंडसर पीआरओमध्ये लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटोनॉमस क्रूझ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सारखे नवीन एडीएएस फीचर्स मिळतील. तसेच, G-Jio नाविन्यपूर्ण कनेक्टिव्हिटी प्लॅटफॉर्ममध्ये अपग्रेड केले जाईल, ज्यामध्ये 100+ AI-पॉवर्ड व्हॉइस कमांड आणि रिअल-टाइम नेव्हिगेशन असेल.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, ABS, EBD, 360-डिग्री कॅमेरा आणि ESC सारखी फीचर्स असतील. याव्यतिरिक्त, चांगले टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि हिल-होल्ड असिस्ट देखील मिळू शकते.
विंडसर प्रो मध्ये सध्याच्या मॉडेलपेक्षा मोठी बॅटरी असेल. यात 50 किलोवॅट किंवा 55 किलोवॅट क्षमतेची बॅटरी पॅक असू शकतो, जो पूर्ण चार्ज केल्यानंतर 450-500 किमी पर्यंतची रेंज देऊ शकतो. लांबच्या प्रवाससाठी या कारमध्ये मोठी बॅटरी देण्यात येणार आहे.
MG Windsor PRO येत्या 6 मे 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे. सध्याची विंडसर कार 9.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत BaaS सर्व्हिससह उपलब्ध आहे. त्याच वेळी, पूर्ण बॅटरीसह ही कार 14-16 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. MG Windsor MG Windsor PRO ची किंमत 16 लाख ते 18 लाख रुपयांच्या दरम्यान लाँच केले जाऊ शकते.