(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India GDP Growth : इराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे भारताची अर्थव्यवस्था काहीशी अस्थिर झाली होती. अशा सगळ्या परिस्थितीत देखील आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकासाची गती अधिक बळकट झालेली पाहायला मिळाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, देशाच्या ‘वास्तविक जीडीपी’मध्ये ७.७ टक्के वाढ नोंदवली गेली आहे; ही वाढ मागील आर्थिक वर्षातील ७.१ टक्के दरापेक्षा अधिक आहे. नेमकी काय आहे आकडेवारी सविस्तर समजून घेऊयात.
शुक्रवारी ‘मिनिस्ट्री ऑफ स्टेटिक्स एंड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन’ने ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, जानेवारी-मार्च २०२६ या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने ७.८ टक्के दराने प्रगती केली. यावरून हे स्पष्ट होते की, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांतही आर्थिक घडामोडींची गती दमदार राहिली.
भारताच्या GDP मधील ही वाढ अशा काळात झाली आहे जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर आहेत आणि भू-राजकीय तणाव तसेच कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे सतत आव्हाने निर्माण होत आहेत.
स्थिर किमतींवर (२०२२-२३) मोजल्या जाणाऱ्या ‘वास्तविक जीडीपी’मध्ये वाढ होऊन तो २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३२३.१२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे; त्याआधीच्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) तो २९९.८९ लाख कोटी रुपये इतका होता. त्याच वेळी, महागाईचा प्रभाव विचारात घेणारा Nominal GDP ८.९ टक्क्यांनी वाढून २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३४६.३६ लाख कोटी रुपयांवर पोहोचला; मागील आर्थिक वर्षात तो ३१८.०७ लाख कोटी रुपये इतका होता.
सरकारच्या म्हणण्यानुसार, हे अंदाज अनेक महत्त्वाच्या आर्थिक निर्देशकांवर आधारित तयार करण्यात आले आहेत. यामध्ये औद्योगिक उत्पादन, जीएसटी (GST) संकलन, कंपन्यांचे आर्थिक निष्कर्ष, वाहनांची विक्री, मालवाहतूक, दूरसंचार सेवांचा वापर, बँकिंग व्यवहार, कर संकलन आणि व्यापार यांशी संबंधित आकडेवारीचा समावेश आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) स्पष्ट केले की, हे नवीन अंदाज तयार करताना २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीची (जानेवारी-मार्च) अद्ययावत आकडेवारी, तसेच आधीच्या तिमाहींची सुधारित आकडेवारी विचारात घेण्यात आली आहे. मंत्रालयाने असेही नमूद केले की, भविष्यात जीडीपी (GDP) आकडेवारी जाहीर करताना ‘औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ (IIP) आणि ‘घाऊक किंमत निर्देशांक’ (WPI) यांच्या नवीन मालिकांचा वापर केला जाईल, ज्यामध्ये २०२२-२३ हे ‘आधारभूत वर्ष’ (base year) असेल.याव्यतिरिक्त, २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची (एप्रिल ते जून २०२६ कालावधीची) जीडीपी आकडेवारी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर केली जाईल.
बापरे… इतकी कमाई! Gautam Adani यांनी रचला इतिहास, 2026 मध्ये दररोज कमवला एवढा मोठा आकडा






