(फोटो सौजन्य: pinterest)
Gautam Adani Per Day Earning: २०२६ मध्ये सुरुवातीपासून बऱ्याच उलथापालथ होत असताना मात्र हे वर्ष उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरलेलं पाहायला मिळत आहे. त्यात मात्र मुकेश अंबानी यांना मात्र त्यात तोटा सहन करावा लागला आहे. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’च्या एका ताज्या अहवालातून हे महत्त्वाची बाब समोर आली आहे. या वर्षी गौतम अदानी यांनी दररोज सरासरी आकडा कोटींमध्ये जात आहेय. नेमका किती आहे हा आकडा आणि मुकेश अंबानी किती पिछाडीवर पडलेत सविस्तर पाहूयात.
फेल ठरलेला प्रयोग पुन्हा? भारतात प्लॅस्टिक नोटा आणण्याबाबत RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचं मोठं विधान
दररोज होणाऱ्या प्रचंड कमाईच्या जोरावर, गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान मिळवले आहे. सध्या ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या ‘ब्लूमबर्ग इंडेक्स’मध्ये १९ व्या स्थानावर आहेत, तर मुकेश अंबानी एका स्थानाने घसरून २० व्या क्रमांकावर आले आहेत. गौतम अदानींची दररोज सरासरी कमाई साधारण १,८९७ कोटी रुपये कमावले, तर मुकेश अंबानी यांना दररोज सरासरी १,३५२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एका ताज्या अहवालानुसार, अदानी समूहाचे EBITDA ९४,८३४ कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. अदानी समूहाने पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. या क्षेत्रांमधील त्यांची वार्षिक गुंतवणूक १.५३ लाख कोटी रुपये इतकी होती. जी भारतातील सर्व कंपन्यांमध्ये सर्वाधिक आहे. परिणामी, त्यांच्या शेअर्सबाबत गुंतवणूकदारांचा विश्वास दृढ राहिला आहे, ज्यामुळे मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये वेगाने वाढ झाली आहे.
मुकेश अंबानींच्या कमाईचा मोठा हिस्सा रिलायन्स इंडस्ट्रीजमधून येतो, जी जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प चालवते. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा फटका अंबानी समूहाच्या व्यवसायाच्या या विभागाला बसला आहे. याचा परिणाम म्हणून, परदेशी गुंतवणूकदार रिलायन्ससारख्या ‘निफ्टी’मध्ये मोठे वजन असलेल्या कंपन्यांमधून आपला पैसा काढून घेत आहेत आणि इतर बाजारपेठांकडे वळत आहेत; यामुळे समभागांच्या किमतीत मोठी घसरण होत आहे.
जर एखाद्या तिमाहीत पेट्रोकेमिकल्स, तेल किंवा किरकोळ विक्री क्षेत्रातील रिलायन्सची कामगिरी बाजाराच्या अपेक्षांनुसार झाली नाही, तर एका दिवसात समभागाची किंमत २-३ टक्क्यांनी घसरू शकते. रिलायन्सचे बाजार भांडवल प्रचंड असल्याने, केवळ २ टक्क्यांची घसरणही अंबानींच्या एकूण संपत्तीतून हजारो कोटी रुपये कमी करते.






