(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आयआरसीटीसीच्या या नवीन उपक्रमाचा परिणाम आकडेवारीमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. नवीन वेबसाइटच्या सुधारित कार्यक्षमतेमुळे बुकिंगच्या गतीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. जुलै २०२६ च्या आकडेवारीनुसार, ऑनलाइन तिकीट बुकिंगचं प्रमाण ८९.८४% पर्यंत वाढलं आहे. या बदलामुळे तात्काळ टिकीट मिळणं सहज आणि सोपं झालं आहे.
१. मॉडर्न डिझाईन ( ग्लासमॉर्फिझम)
ही वेबसाइट ‘ग्लासमॉर्फिझम’ सारख्या जागतिक डिझाइन ट्रेंडपासून प्रेरित आहे. ही डिझाईन दिसायला आकर्षक आहे. लॉगिनपासून ते तिकीट कन्फर्मेशनपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि सुरळीत होते हे याचं मुख्य वैशिष्ट्य आहे.
२. एकाच स्क्रीनवर संपूर्ण माहिती
प्रवाशांना आता स्लीपर, एसी ३-टियर आणि एसी २-टियर यांसारख्या वेगवेगळ्या क्लासमधील उपलब्ध असलेल्या सिट्स तपासण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी क्लिक करण्याची गरज भासणार नाही. सर्व माहिती एकाच स्क्रीनवर उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे पर्यायांची तुलना करणे सोपे होईल आणि योग्य निवड करता येईल.
३. व्यत्यय कमी
आता त्रासदायक पॉप-अप असणार नाहीत. वापरकर्त्यांच्या अभिप्रायानुसार, IRCTC ने CAPTCHA आणि त्रासदायक पॉप-अप जाहिरातींची संख्या लक्षणीयरीत्या कमी केली गेली आहे. यामुळे या सगळ्या प्रक्रिया करत असताना थांबून राहवं लागणारा वेळ आणि जलद पद्धतीने वापरता येईल.
४. जलद तत्काळ बुकिंग
वेबसाइटची सुधारित कार्यक्षमता विशेषतः तत्काळ बुकिंगसाठी फायदेशीर आहे, जिथे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्हाला लगेच टिकीट उपलब्ध होऊ शकतं. त्याच वेळेत सगळी प्रक्रिया होऊन जाते.
५. डिजिटल परिवर्तन
IRCTC च्या मते, या परिवर्तनाचा प्राथमिक उद्देश युझर इंटरफेस (UI) सुधारणे आणि प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव प्रदान करणे हा आहे. हा केवळ वेबसाइटमध्ये बदल करण्याचा प्रयत्न नसून, ऑनलाइन आरक्षणाचा अनुभव पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न आहे. रेल्वेने म्हटले आहे की ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असून, वापरकर्त्यांच्या अभिप्रायानुसार प्रणालीमध्ये आणखी सुधारणा केल्या जातील.






