(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (POWERGRID) ने तरुणांसाठी रोजगाराची एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने ‘ज्युनियर ऑफिसर ट्रेनी’, ‘डिप्लोमा ट्रेनी’ आणि ‘ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी’ यांसारख्या पदांसह, एकूण ६६० ‘नॉन-एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोण करु शकतं अप्लाय, काय आहे शेवटची तारीख? जाणून घेऊयात सविस्तर
विशेष म्हणजे, POWERGRID ची सहायक कंपनी असलेल्या CTUIL अंतर्गत विविध पदांसाठीही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती मोहिमेसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २० एप्रिल २०२६ रोजी सुरू होणार आहे. ज्या तरुणांकडे डिप्लोमा, ITI प्रमाणपत्र किंवा पदवी आहे, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे; कारण या पदांसाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून, त्यामुळे तांत्रिक आणि अ-तांत्रिक (non-technical) अशा दोन्ही पार्श्वभूमीवरील उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतात.
‘डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल)’ या पदासाठी, उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मधील तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा डिग्री असणे आवश्यक आहे. General, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ७०% गुण मिळवणे अनिवार्य आहे; तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी केवळ उत्तीर्ण गुण मिळवणे पुरेसे मानले जात आहेत. ‘डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल)’ या पदासाठी, सिविल इंजीनियरिंगमधील तीन वर्षांचा डिप्लोमा आणि त्यामध्ये ७०% गुण असणे आवश्यक आहे.






