Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी अलर्ट! सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव कायम; बाजाराची लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता
मंगळवारी, भारतीय शेअर बाजाराने दोन दिवसांची घसरण थांबवत अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार संपवला, आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,२०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स ३९४.५० अंकांनी, म्हणजेच ०.५४ टक्क्यांनी वधारून ७३,९१८.७६ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० ११९.१० अंकांनी, म्हणजेच ०.५२ टक्क्यांनी वाढून २३,२४२.१० अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टी निर्देशांक मंगळवारी १,१३०.७५ अंकांनी, म्हणजेच २.०९ टक्क्यांनी वाढून ५५,१९४.५० वर बंद झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र आज शेअर बाजारात काय घडणार, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी सिटी युनियन बँक, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी, एस्टर डीएम हेल्थकेअर, साई लाईफ सायन्सेस आणि चेन्नई पेट्रोलियम या पाच ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार अजंता फार्मा, भारती एअरटेल, डिक्सन टेक्नॉलॉजीज, ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एमक्योर फार्मास्युटिकल्स, हिंदुजा ग्रुप सोल्युशन्स, इंटरग्लोब एव्हिएशन, एनएलसी इंडिया, ओएमसी क्षेत्र, वेल्सपन कॉर्प या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.
चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी इंट्राडे ट्रेडिंगसाठी खरेदी आणि विक्री करण्याकरिता आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. बाजार तज्ञांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड, मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड, ॲस्ट्रल लिमिटेड, म्फासिस लिमिटेड, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांचा समावेश आहे.






