Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी गॅप-अपने उघडण्याची शक्यता; 'या' शेअर्सवर मिळू शकतो दमदार परतावा
शुक्रवारी भारतीय शेअर बाजार वधारून बंद झाला, मात्र बेंचमार्क निफ्टी ५० २४,४०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स १६६.४९ अंकांनी, म्हणजेच ०.२१ टक्क्यांनी वाढून ७८,०९४.६४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ६६.४५ अंकांनी, म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी वाढून २४,३८३.६० वर स्थिरावला. आज आठवड्याच्या सुरुवातीला काय होणार, कोणते शेअर्स नफा कमावून देणार, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये रतन इंडिया पॉवर, टाटा पॉवर आणि एचडीएफसी एएमसी यांचा समावेश आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आजच्या व्यवहारात आयआरईडीए, एसबीआय फंड्स मॅनेजमेंट, टॉरेंट पॉवर, अथर एनर्जी, नझारा टेक्नॉलॉजीज, डोम्स इंडस्ट्रीज, आयटीसी, मारुती सुझुकी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, सन फार्मा, झी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एनसीसी, पॉवरिका, ल्युपिन या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, गेल (GAIL), जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, रामकृष्ण फोर्जिंग्स आणि चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स या पाच शेअर्सची निवड केली आहे.
चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, गणेश डोंगरे आणि आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक या बाजार तज्ज्ञांनी आज खरेदी आणि विक्री करण्यासाठी सात स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी निवडलेल्या या शेअर्समध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड, अदानी टोटल गॅस लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आणि व्हीए टेक वाबाग लिमिटेड यांचा समावेश आहे.






