Maharashtra Breaking News Updates Today
Maharashtra to National And International Breaking News: बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी
Maharashtra Religion Conversion Law: ‘राज्य सरकारने तयार केलेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्रातील धर्मांतरासंदर्भातील महत्त्वाचा ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026’ आता अधिकृतपणे लागू झाला आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झालेल्या या विधेयकाला राज्यपालांनंतर राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळाली असून, 30 जुलैच्या राजपत्रात तो प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे.
03 Aug 2026 06:01 PM (IST)
इराणने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आणखी एका संवेदनशील प्रकरणात कठोर पाऊल उचलत इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दोन नागरिकांना सोमवारी फाशी दिली. इराणच्या न्यायव्यवस्थेने या दोघांवर इस्रायली गुप्तचर संस्था मोसादसाठी काम केल्याचा आरोप ठेवला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी देशातील संवेदनशील लष्करी आणि सुरक्षा माहिती परदेशी गुप्तचर संस्थेला पुरवल्याचा निष्कर्ष तपासात समोर आला.
03 Aug 2026 05:51 PM (IST)
सांगली येथे पहिल्यांदाच होणार्या विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लिग स्पर्धेच्या जर्सी तसेच ट्रॉफी अनावरण व खेळाडू निवड सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. धनकवडी येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात आयपीएलच्या धर्तीवर व्हीएमपीएलच्या सोहळ्यास मराठी चित्रपट कलाकारांची मांदियाळी जमली होती. भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली व अभिजित कदम मेमोरियल फौंडेशनच्यावतीने १५ व १६ ऑगस्ट रोजी सांगलीतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एसबीजीआय टर्फमध्ये प्रकाश झोतात या स्पर्धा होणार आहेत.
03 Aug 2026 05:35 PM (IST)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संघटनात्मक घडामोडी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कल्याण लोकसभा महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला आणखी एक धक्का मानला जात आहे. अलीकडच्या काळात पक्षातील काही नेत्यांच्या निर्गमनानंतर आता या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
03 Aug 2026 05:23 PM (IST)
बारामती शहरात सन २०२३ मध्ये नियमभंगामुळे सिलबंद करण्यात आलेले काही कत्तलखाने पुन्हा नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशांत सातव यांच्यासह नेरा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष विजयराव कुटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
03 Aug 2026 05:12 PM (IST)
मद्यप्रेमींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. काही लोकप्रिय ब्रँड्सच्या विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. अन्न सुरक्षा नियामक एफएसएसआयने ओल्ड मॉन्क सह अनेक सुप्रसिद्ध मद्य ब्रँड्सच्या काही प्रकारांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. काही काळापासून Old Monk बाजारात उपलब्ध नव्हती अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण आता Old Monk सोबतच मद्यप्रेमींच्या आवडीचे काही ब्रँड मार्केटमध्ये मिळणं पूर्णपणे बंद ( Liquor Ban ) झाले आहेत.
03 Aug 2026 04:57 PM (IST)
अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा तापला असतानाच आता महाराष्ट्रातील एका मंदिरातील आर्थिक घोटाळ्याचे प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान समितीमध्ये तब्बल 60 कोटी 75 लाख 28 हजार रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणी उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
03 Aug 2026 04:47 PM (IST)
राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच “राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं” असे भावनिक वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना वेग आला आहे. त्यांच्या या विधानावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “जर पंकजा मुंडे राजकारणातून बाजूला झाल्या तर त्याचे गंभीर परिणाम होतील. गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची क्षमता पंकजा मुंडे यांच्यात असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. त्याचवेळी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आणि सामाजिक समतोल बिघडू शकतो,” असा दावा केला. वाचा सविस्तर...
03 Aug 2026 04:37 PM (IST)
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) गेल्या काही दिवसांपासून पेटलेला हिंसाचार आणि नागरिकांचा रोष आता अनियंत्रित झाला आहे. महागाई, मुलभूत हक्कांची पायमल्ली आणि निवडणुकांमधील हेराफेरीविरोधात स्थानिक जनता रस्त्यावर उतरली आहे. मात्र, हा अभूतपूर्व जनाक्रोश दडपण्यासाठी पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारने आणि लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील लष्कराने संपूर्ण प्रदेशात क्रूर दडपशाही सुरू केली आहे. या परिस्थितीचे जागतिक स्तरावर निष्पक्ष वृत्तांकन करणाऱ्या नामांकित आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘अल-जझीरा इंग्लिश’च्या (Al Jazeera English) संकेतस्थळावर (Website) पाकिस्तान सरकारने अनधिकृतपणे बंदी घातली आहे. वाचा सविस्तर...
03 Aug 2026 04:27 PM (IST)
बीडच्या राजकारणातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या एक वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं…माझ्या विचाराला समरस नाही अस वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल.”असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची बीडसह राज्याच्याही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. वाचा सविस्तर...
03 Aug 2026 04:17 PM (IST)
दिल्ली न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांची लैंगिक छळाच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयावर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून यावर प्रतिक्रिया दिली. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात लवकरच उच्च न्यायालयात अपील दाखल केले जाईल, असेही तिने म्हटले आहे. वाचा सविस्तर...
03 Aug 2026 04:07 PM (IST)
बिहारच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या 15व्या फेरीनंतर ते भाजपचे उमेदवार नीरज सिन्हा यांच्यापेक्षा 8,202 मतांनी पुढे असल्याचे चित्र समोर आले आहे. या निकालामुळे भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतमोजणीदरम्यान उपलब्ध आकडेवारीनुसार, भाजपचे नीरज सिन्हा 21,550 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत, तर राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)च्या रेखा गुप्ता यांना आतापर्यंत 6,755 मते मिळाली असून त्या तिसऱ्या स्थानावर आहेत. सुरुवातीपासूनच जनसुराजने आघाडी कायम ठेवली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वाचा सविस्तर...
03 Aug 2026 04:00 PM (IST)
Ramayana Controversy: दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुप्रतिक्षित आणि भव्य पौराणिक चित्रपट ‘रामायण’ प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे आणि यश यांसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. (Ramayana Controversy)
03 Aug 2026 03:50 PM (IST)
कराड: कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रत्येकी सहा फूट उचलण्यात आले असून, पायथा विद्युत गृहातूनही विसर्ग सुरू आहे. धरणातून कोयना नदीपात्रात सध्या एकूण ३३ हजार ८२६ क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडले जात आहे.
03 Aug 2026 03:45 PM (IST)
बिहार: बिहारमधील घडलेल्या आई आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाच्या दुहेरी हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. सुरुवातीला हे प्रकरण गूढ मानले जात असताना, तपासात प्रेमसंबंध, संशय आणि पुरावे नष्ट करण्यासाठी केलेल्या क्रूर हत्येचा थरारक कट समोर आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी विकास पासवान याला अटक करण्यात आली असून, त्याच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी सहा वर्षीय आर्यनचा मृतदेहही जप्त केला आहे.
03 Aug 2026 03:35 PM (IST)
अफगाणिस्तान चीन आणि इतर देशांमधून भारतात आयात होणाऱ्या बेदाण्याचा किमान तीनशे रुपये बेस रेट ठरवून त्यावर 100% आयात शुल्क आकारावे, चीनच्या द्राक्षाला 100% आयात कर लावावा कारण चीन बांगलादेश यांनी भारतीय द्राक्षांना आयात कर लावला आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे त्यासाठी सरकारने 50% अनुदान द्यावे सांगली जिल्ह्यात आयसीडी पोर्ट झाले पाहिजे.
03 Aug 2026 03:25 PM (IST)
Nagpur : डिजिटल प्लॅटफॉर्मवर शासकीय संस्था, खासगी विकासक तसेच सामान्य घरमालकही घरे भाड्याने देण्यासाठी नोंदणी करू शकणार आहेत. ओला-उबरच्या धर्तीवर तयार करण्यात येणाऱ्या पोर्टलद्वारे भाडेकरू आणि घरमालकांना थेट डिजिटल माध्यमातून जोडण्यात येणार आहे.
03 Aug 2026 03:15 PM (IST)
भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी अलीकडेच केलेल्या “राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं” या भावनिक वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसने मोठी राजकीय चाल खेळत पंकजा मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याची आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची खुली ऑफर दिली आहे.
03 Aug 2026 03:05 PM (IST)
रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) दरम्यान गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस अधिक हिंसक आणि भीषण रूप धारण करत आहे. रविवारी, २ ऑगस्ट २०२६ रोजी, रशियन हवाई दलाने दक्षिण-पूर्व युक्रेनमधील आघाडीवरील अत्यंत महत्त्वाचे औद्योगिक केंद्र मानल्या जाणाऱ्या झापोरिझिया (Zaporizhzhia) शहरावर एकामागोमाग एक अशा तब्बल आठ शक्तिशाली ग्लाइड बॉम्बचा (Guided Aerial Bombs / KAB) मारा केला.
03 Aug 2026 02:59 PM (IST)
जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा. उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर फोकस करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेकडून इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर नाराजी व्यक्त करताना म्हटलंय. सभागृह नेते गणेश खणकर यांनी प्रस्ताव हा प्रस्ताव मांडला होता. चौफेर टीकेनंतर प्रस्ताव मागे घेण्याची वेळ आली आहे.
03 Aug 2026 02:50 PM (IST)
पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात पोलिस व्हॅनचा अपघात झाल्याने एकामागोमाग सात वाहनांना धडक बसली. या घटनेत कार आणि अनेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून अपघाताचे CCTV फुटेज समोर आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. या प्रकरणाबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
03 Aug 2026 02:39 PM (IST)
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी महेश केदार यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. जामीन अर्जावर सविस्तर युक्तिवाद मांडण्यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांनी अतिरिक्त वेळ मागितला. त्यानुसार न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.
03 Aug 2026 02:30 PM (IST)
भिवंडीतील कामवारी नदीची पाणीपातळी अचानक वाढल्याने नदीकाठी उभी असलेली रिकामी ट्रॅव्हलर व्हॅन पुराच्या प्रवाहात वाहून गेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मुसळधार पाऊस आणि धरणातून झालेल्या पाणीविसर्गामुळे नदीला पूर आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
03 Aug 2026 02:21 PM (IST)
भिवंडीतील कामवारी नदीची पाणीपातळी अचानक वाढल्याने नदीकाठी उभी असलेली रिकामी ट्रॅव्हलर व्हॅन पुराच्या प्रवाहात वाहून गेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मुसळधार पाऊस आणि धरणातून झालेल्या पाणीविसर्गामुळे नदीला पूर आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
03 Aug 2026 02:10 PM (IST)
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंनी पक्षातून बाहेर पडून ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे, असे आवाहन केले. विदर्भातील 11 जिल्ह्यांत मंडल यात्रा सुरू होत असून, ओबीसी जातनिहाय जनगणना, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, महाज्योतीसाठी 1000 कोटी निधी, बॅकलॉग भरती आणि लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पीय तरतुदीची मागणी त्यांनी केली. सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली.
03 Aug 2026 02:00 PM (IST)
प्रत्येकाला आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं नेहमी वाटतं. पण हे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. कारण तुमचं स्वतःच घर घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. जे लोक घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत आणि गृहकर्जाबद्दल चौकशी करत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी आहे. एका बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नेमकी कोणती बँक आहे जिने व्याजदर कमी केले आहेत? आणि नेमका कोणाला हे कर्ज मिळेल? सविस्तर जाणून घेऊयात.
03 Aug 2026 01:55 PM (IST)
यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीला संवाद, संयम आणि विकासाची दिशा दिली. मात्र, त्यांची कर्मभूमी असलेल्या कराडमध्ये अलीकडच्या काळात पंचायत समिती आणि नगरपालिका सभांमध्ये विविध मुद्द्यांवरून निर्माण झालेल्या राजकीय संघर्षामुळे स्थानिक राजकारणाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील मतभेद लोकशाहीचा अविभाज्य भाग असले, तरी ते व्यक्त करताना सभागृहातील संवादाची पातळी, परस्परांचा सन्मान आणि विषयाधारित चर्चा कायम राहावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
03 Aug 2026 01:50 PM (IST)
सर्वात बलाढ्य लाल चेंडूच्या संघांपैकी एक मानला जात असूनही, भारताने अद्याप डब्ल्यूटीसी (WTC) विजेतेपद जिंकलेले नाही. इंग्लंड दौऱ्यावर दोन विजय आणि एक बरोबरी साधून भारताने आपल्या मोहिमेची चांगली सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३ महिन्यांतील दुसरी मालिका गमावल्याने त्यांना मोठा धक्का बसला. २०२४ मध्ये न्यूझीलंडकडून ०-३ ने पराभूत झाल्यानंतर, भारताच्या खराब कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ असा पराभव झाला. भारत सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे आणि आता त्यांचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.
03 Aug 2026 01:45 PM (IST)
महाराष्ट्राच्या स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलतर्फे इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटमधील प्रवेशासाठी सेंट्रलाइज्ड राऊंड 1 (CAP Round 1) ची सीट अलॉटमेंट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे, जी एक प्रोव्हिजनल लिस्ट आहे. कॅप अंतर्गत सीट पाहत असलेले उमेदवार आपल्या रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म तारीख किंवा पासवर्डच्या मदतीने संबंधित काउन्सिलिंग पोर्टलवर जाऊन त्यांना सीट अलॉट झाली आहे की नाही, हे पाहू शकतात. अलॉटमेंट स्टेटस पाहिल्यानंतर उमेदवार पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
03 Aug 2026 01:40 PM (IST)
भविष्यातील युद्धे, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, ड्रोन, अंतराळ आणि संयुक्त लष्करी ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करून भारतीय सैन्याचा नवीन कोर्स सुरू करण्यात आला आहे, ज्याचा मुख्य उद्देश भारताच्या संरक्षण तयारीला भविष्यातील तांत्रिक आणि धोरणात्मक आव्हानांनुसार बळकट करणे हा आहे. या दिशेने हा कोर्स अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आज म्हणजेच ३ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्ली येथे तिन्ही सेनांसाठी ‘फ्युचर वॉरफेअर-संचालन कोर्स’ सुरू करण्यात आला आहे.
03 Aug 2026 01:35 PM (IST)
उत्तर आफ्रिकेच्या किनारपट्टीवर वसलेल्या स्पेनच्या स्वायत्त सेउटा (Ceuta) प्रदेशात सध्या एक अभूतपूर्व आणि अत्यंत गंभीर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित संकट निर्माण झाले आहे. हजारो निर्वासित आणि स्थलांतरित समुद्राच्या मार्गाने पोहून किंवा लहान बोटींचा वापर करून स्पॅनिश सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अवैध स्थलांतर रोखण्यासाठी स्पेन सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले असून, सेउटाच्या सागरी सीमेवर एक विशाल तरंगता अडथळा (Floating Marine Barrier) तैनात केला आहे.
03 Aug 2026 01:30 PM (IST)
दोन दिवसांपूर्वीच भिवंडीतील चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली होती. मात्र आज (3 ऑगस्ट 2026) झालेल्या भीषण दुर्घटनेत अनेक नागरिकांचे प्राण वाचवणारे TDRF जवान विकास गोरे (TDRF Jawan Vikas Gore) यांचे रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात निधन झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासनावर तीव्र टीका होत आहे.
03 Aug 2026 01:25 PM (IST)
अमरावती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घडलेली घटना अमरावती चौक परिसरातील बापट चौक परिसरात रविवारी उशिरा रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
03 Aug 2026 01:15 PM (IST)
गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर रामकुंड आणि परिसरातील गोदापात्राला सध्या ‘खुले सर्व्हिस स्टेशन’चे स्वरूप आले आहे. पुराचे पाणी कमी होताच स्थानिक नागरिक तसेच वाहनधारकांनी आपापल्या दुचाकी व चारचाकी गाड्या धुण्यासाठी गोदापात्रात उघडपणे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पात्रातच वाहने धुवून तेल, ग्रीस आणि डिटर्जंटचे पाणी थेट नदीत सोडले जात असूनही महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या गंभीर प्रकाराकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव संताप व्यक्त होत आहे.
03 Aug 2026 01:05 PM (IST)
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, सध्या जिल्ह्यातील ५६ जलप्रकल्पांमध्ये एकूण ५२७.८२ दलघमी म्हणजेच ५०.४१ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला. मात्र, जिल्ह्यातील सर्वात मोठे अपर वर्धा धरण अद्यापही समाधानकारक भरलेले नसून त्यासाठी मध्य प्रदेशातील कॅचमेंट क्षेत्रात दमदार पावसाची आवश्यकता आहे. या भागात पाऊस कमी झाल्याने धरणातील जलसाठा अपेक्षित वेगाने वाढत नसल्याचे चित्र आहे.
03 Aug 2026 12:48 PM (IST)
सिल्लोड शहरात २९ जुलै रोजी झालेल्या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी मयताच्या पत्नीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. सिल्लोड शहरालगत २९ जुलै २०२६ रोजी एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागील भागात एका व्यक्तीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येऊन पोलिस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्याकडे तपास देण्यात आला. सिल्लोड शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या चार दिवसांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
03 Aug 2026 12:36 PM (IST)
अनैतिक संबंधातून एकावर महिलेने चाकूने वार केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली आहे. या प्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेश्मा रज्जाक शेख (वय ४०), रुखसार जावेद कोडगनुर (वय २३), सोहेल रज्जाक शेख (तिघे रा. भराव वस्ती, जुन्या बाजाराजवळ, मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३७ वर्षीय व्यक्तीने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रेश्मा हिचे तक्रारदाराशी गेल्या १६ वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. तक्रारदार तरुण तिला खर्चासाठी नियमित पैसे द्यायचा. आरोपी रेश्माने तिच्या एका मित्राला दुचाकी वापरण्यास दिली होती. या कारणावरुन २८ जुलै रोजी रात्री त्यांच्यात वाद झाला. वादातून आरोपी रेश्माने तक्रारदार तरुणाला शिवीगाळ करुन त्याच्या गालावर चाकूने वार केला. रेश्मा हिची विवाहित मुलगी आणि साथीदाराने तरुणाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे तक्रारदार तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार खिलारे तपास करत आहेत.
03 Aug 2026 12:24 PM (IST)
दुचाकीवरुन भरधाव निघालेल्या तिघांना जाब विचारल्याने तरुणावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना पाषाण परिसरात घडली आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी दुचाकीस्वारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जीवन मेघावत, देवीदास मेघावत, रोहित मेघावत (तिघे रा. लमाणतांडा, पाषाण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने बाणेर पोलिसांत तक्रार दिली आहे.
03 Aug 2026 12:12 PM (IST)
प्रेमास नकार दिल्याच्या रागातून १७ वर्षीय विद्यार्थिनीचा सातत्याने पाठलाग करून तिचा मानसिक छळ करणाऱ्या तरुणाने भररस्त्यात अडवून तिला शिवीगाळ करित मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच तिच्यासह तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. हा प्रकार २० ऑक्टोबर २०२४ ते २५ जुलै २०२६ दरम्यान घडला आहे. रोहन गायकवाड (वय २१, रा. भिमपुरा, उस्मानुपरा) असे विद्यार्थिनीचा पाठलाग करुन तिला मारहाण करणाऱ्याचे नाव असून त्याच्याविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात १७ वर्षीय पीडित विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे.
03 Aug 2026 11:50 AM (IST)
स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक आणि ‘प्रतिसरकार’चे प्रणेते म्हणून क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जन्म आज ३ ऑगस्ट १९०० मध्ये सांगली जिल्ह्यातील येडे मच्छिंद्र येथे झाला. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात तीव्र लढा पुकारत १९४२ च्या ‘छोड़ो भारत’ आंदोलनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. सातारा जिल्ह्यात ब्रिटिशांची सत्ता पूर्णपणे उखडून लावून त्यांनी ‘प्रतिसरकार’ (समानांतर सरकार) ची यशस्वी स्थापना केली, ज्याला लोक प्रेमाने ‘पत्री सरकार’ म्हणूनही ओळखत असत. ते केवळ राजकीय नेते नव्हते, तर शेतकरी, कामगार आणि उपेक्षितांचे खरे कैवारी होते; त्यांनी गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘न्यायदान मंडळ’ स्थापन करून स्वतः न्यायव्यवस्थाही चालवली.
03 Aug 2026 11:40 AM (IST)
केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना 1 लाख 9 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त अग्रीम कर वितरणाचा हप्ता जारी केला आहे. या वाटपात महाराष्ट्राला 7 हजार 22 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे राज्यातील पायाभूत सुविधा आणि विविध विकास प्रकल्पांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. राज्यांच्या आर्थिक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि विकासकामांना वेग देण्याच्या उद्देशाने अतिरिक्त अग्रीम कर देण्यात येतो.
03 Aug 2026 11:35 AM (IST)
Honor Smartphone Launched: टेक कंपनी हॉनरने चीनमध्ये त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेन्ससह कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Honor Play 11 Pro या नावाने सादर केला आहे. लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन ऑनलाईन स्टोअरवर लिस्ट करण्यात आला आहे
03 Aug 2026 11:25 AM (IST)
यवतमाळमध्ये बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने तब्बल ९८ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यात एकाच दिवसात तब्बल १३५ मिमी विक्रमी पावसाची नोंद होवून नदी, नाल्याला प्रचंड पूर आला. यासह जीवहाणीसह वित्त हानीसुध्दा झाली. तसेच २६ हजारावरील शेतपिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला.
03 Aug 2026 11:20 AM (IST)
राज्यात शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन व कडक नियम लागू करण्यात आला आहे. शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या राज्यातील सर्व अंशतः अनुदानित, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
03 Aug 2026 11:16 AM (IST)
श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान झालेल्या डाव्या गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरू न शकल्याने स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. निवड समितीने जसप्रीत बुमराहच्या जागी जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीला भारतीय कसोटी संघात स्थान दिले आहे. IND vs SL टेस्ट क्रिकेटमध्ये आता २८ वर्षीय आकिबला भारतीय संघात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
03 Aug 2026 10:56 AM (IST)
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भाऊ बहिणीचं एकमेकांवर जडलं प्रेम, घरच्यांचा विरोध जुगारून लग्न केलं, मात्र अवघ्या तीन महिन्यात नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली, नंतर स्वतःही आत्महत्या केली. असं काय नेमकं घडलं या तीन महिन्यात की थेट हत्या आणि आत्महत्या करावी लागली. चला जाणून घेऊया?
03 Aug 2026 10:46 AM (IST)
पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशाख व खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) शास्त्रज्ञांनी विश्व संशोधनात महत्त्वाची कामगिरी करत दोन लघु आकाशगंगांना जोडणाऱ्या ‘मॅजेनिक ब्रिज’ प्रदेशात प्रथमच एका दुर्मीळ युगल (बायनरी) तारकीय प्रणालीचा शोध लावला आहे. या संशोधनाचे नेतृत्व डॉ. तथागत साहा आणि प्रा. चान्द्रेयी मैत्रा यांनी केले असून, या शोधामुळे परस्परसंवाद करणाऱ्या आकाशगंगांमधील ताऱ्यांची निर्मिती आणि उत्क्रांती अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होणार आहे. हा शोध ‘ईरोसिता’ या अत्याधुनिक क्ष-किरण दुर्बिणीच्या सर्वेक्षणातील माहितीच्या विश्लेषणातून लागला. या प्रणालीमध्ये पांढरा बटू (व्हाइट ड्वार्फ) आणि त्याभोवती परिभ्रमण करणारा लाल महातारा (रेड जायंट) आहे.
03 Aug 2026 10:36 AM (IST)
पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजने दमदार सुरुवात केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, यजमान संघाने दिवसाचा खेळ संपताना ५ गडी गमावून २३९ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून जस्टिन ग्रीव्हज आणि कर्णधार रॉस्टन चेस खेळपट्टीवर होते. ग्रीव्हज १२५ चेंडूंमध्ये ६४ धावांवर नाबाद होता, तर रॉस्टन चेस ३६ धावांवर खेळत होता.
03 Aug 2026 10:26 AM (IST)
पुणे महानगरपालिकेत एकाच दिवसात ४०७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घडामोडीतील सर्वात वादग्रस्त बाब म्हणजे, बदल्यांचे आदेश मध्यरात्री जारी करण्यात आले. जेव्हा महानगरपालिकेचे बहुतांश कर्मचारी मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) मोहिमेत व्यस्त असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांना या बदल्यांविरुद्ध वरिष्ठ अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींकडे तात्काळ आक्षेप नोंदवता येऊ नये, यासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक ही वेळ निवडली आहे, असा आरोप कर्मचारी संघटनांकडून करण्यात आला आहे.
03 Aug 2026 10:16 AM (IST)
तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर आहात का? तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेमिंग कंपनी गरेनाने फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या प्लेअर्ससाठी 3 ऑगस्टचे रिडीम कोड्स जारी केले आहेत. या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना एकही डायमंड खर्च न करता विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. कोड्स रिडीम करून प्लेअर्स स्किन्स, स्टाइलिश बंडल्स, गन स्किन्स आणि इतर एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मोफत अनलॉक करू शकणार आहेत. पण हे कोड्स मर्यादित काळासाठी व्हॅलिड असतात. त्यामुळे जर तुम्हाला रिडीम कोड्सद्वारे रिवॉर्ड्स क्लेम करायचे असतील तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे.
03 Aug 2026 10:07 AM (IST)
भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तब्बल ६६१ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या असून, त्यापैकी २०४ इमारती अतिधोकादायक श्रेणीत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या २०४ अतिधोकादायक इमारतींपैकी १४३ इमारतींमध्ये अद्याप नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. उर्वरित ६१ अतिधोकादायक इमारती रिकाम्या आहेत. अतिधोकादायक इमारतींची दुरुस्ती करणे शक्य नसल्याने त्या पाडणे हाच पर्याय आहे

