(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इंडोनेशियाला जायचा प्लॅन करताय? मग टेन्शन मिटलं! तिथेही फक्त QR कोड स्कॅन करा अन् UPI ने करा पेमेंट
तमिळनाडूतील वल्लम प्रकल्पाच्या अलीकडील यशानंतर, गंगैकोंडन येथील ही नवी सुविधा या प्रगतीचे पुढील पाऊल दर्शवते. हा प्रकल्प स्वयंचलित यंत्रणा आणि स्मार्ट उत्पादन प्रक्रियेवर आधारित आहे. तसेच, सेल, वेफर आणि इनगॉट निर्मितीमधील कंपनीच्या नियोजित विविधांगी एकत्रीकरणासाठी हा प्रकल्प पाया रचला आहे. हा तामिळनाडूतील कंपनीचा नवीन उत्पादन प्रकल्प असून तो विक्रम सोलरच्या विस्ताराच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यासोबतच, भारताची देशांतर्गत सौर उत्पादन क्षमता मजबूत करण्याप्रती असलेली आपली कटिबद्धता कंपनीने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
तब्बल सहा लाख चौरस फुटांवर पसरलेल्या या नवनिर्मित मॉड्युल निर्मिती कारखान्यामुळे १,५०० हून अधिक कुशल व्यावसायिकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. ही गुंतवणूक भारताच्या स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्राचा विस्तार करण्यासोबतच प्रादेशिक औद्योगिक विकासाला चालना देणारे एक मोठे पाऊल आहे. हा कारखाना मॉड्युल निर्मितीच्या आधुनिक मानकांनुसार उभारलेला असून तो उच्च स्वयंचलित प्रकल्प आहे. भविष्याचा वेध घेणारा हा स्मार्ट कारखाना असून तो कार्यक्षमता, गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुधारण्यासाठी प्रगत स्वयंचलित तंत्रज्ञान आणि डिजिटल उत्पादन तंत्रज्ञान यांचा मिलाफ घडवून आणतो.
उत्पादन सुरु असताना वेळोवेळी देखभालीपासून ते प्रत्येक टप्प्यावरील स्वयंचलित गुणवत्ता तपासणीपर्यंत, ही अत्याधुनिक सुविधा मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी आणि अधिकाधिक अचूकता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक सौर मॉड्यूल दशकानुदशके विश्वसनीयपणे काम करेल, ही खात्री मिळते. येथील मुख्य वैशिष्ट्यांमध्ये संपूर्ण उत्पादन प्रक्रियेचे क्षणोक्षणी निरीक्षण, उत्पादित केलेल्या प्रत्येक सौर मॉड्यूलचा संपूर्ण माग ठेवणे, दोष अधिक अचूकतेने शोधणारी स्वयंचलित तपासणी यंत्रणा आणि महत्त्वपूर्ण टप्प्यांवर स्वयंचलित हाताळणी यांचा समावेश आहे. ग्राहकांना सातत्याने उच्च दर्जाची उत्पादने मिळतील, याची खात्री करण्यासाठी हा प्रकल्प मॉड्यूल्सच्या कामगिरीच्या आधारे त्यांचे स्वयंचलितपणे वर्गीकरण, सॉर्टिंग आणि पॅकेजिंग करण्यासाठी स्मार्ट प्रणालीचा वापर करतो.
सदर प्रकल्पामध्ये उत्पादित करण्यात आलेली हायपरसोल एन-टाइप टॉपकॉन जी१२आर मॉड्यूल्स हे विक्रम सोलरचे पहिले उत्पादन आहे. ते २३.६९ टक्क्यांपर्यंतच्या मॉड्यूल कार्यक्षमतेसह ६१५-६४० डब्ल्यूपी श्रेणीपर्यंतची ऊर्जा प्रदान करते.
गंगैकोंडन प्रकल्प हा भारतातील एक पूर्णपणे एकात्मिक सौर उत्पादन परिसंस्था उभारण्याच्या विक्रम सोलरच्या दीर्घकालीन उद्दिष्टाचा मुख्य आधारस्तंभ आहे. आगामी काही वर्षांत, या प्रकल्पामध्ये टप्प्याटप्प्याने मॉड्युल, सेल, वेफर आणि इनगॉट निर्मितीचे प्रकल्प सुरू केले जातील आणि त्यामुळे सौर क्षेत्राची संपूर्ण मूल्य साखळी एकाच छताखाली येईल. या एकात्मिक संरचनेमुळे पुरवठा साखळी अधिक मजबूत होणार आहे. तसेच उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण सुधारेल आणि वाहतूक आणि इतर आनुषंगिक खर्च कमी होतील.
याचबरोबर देशांतर्गत मूल्यवृद्धी वाढेल. या आराखड्यांतर्गत विक्रम सोलरचे आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत ९ गिगावॉट सौर सेल उत्पादन क्षमता स्थापित करण्याचे, आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत त्यात आणखी ३ गिगावॉटची भर घालण्याचे आणि आर्थिक वर्ष २०२९-३० पर्यंत १२ गिगावॉट वेफर आणि इनगॉट उत्पादन क्षमता जोडण्याचे उद्दीष्ट आहे. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि स्वावलंबी सौर उत्पादन परिसंस्था उभारण्याची कंपनीची वचनबद्धता यातून आणखी बळकट होते.
विक्रम सोलरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. ज्ञानेश चौधरी या नवीन प्रकल्पाबाबत माहिती देताना म्हणाले, “आमच्या गंगैकोंडन प्रकल्पातून पहिल्या सोलर मॉड्युलची निर्मिती होणे, हा विक्रम सोलरच्या वाढीच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरात एकूण १० गिगावॉटपेक्षा जास्त सोलर मॉड्युल पुरवण्याचा टप्पा आम्ही पार केला आहे. बाजारातील प्रत्यक्ष मागणी लक्षात घेऊन आम्ही आमची उत्पादन क्षमता वाढवत आहोत. या प्रकल्पामध्ये टप्प्याटप्प्याने सोलर सेल, वेफर आणि इंगॉटचे उत्पादन सुरू करून आम्ही एकात्मिक उत्पादन विश्व साकारले आहे. हे व्यासपीठ भारताच्या स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या धोरणानुरुप साकारण्यात आलेले आहे आणि त्यामुळे देशाची पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल. तसेच देशांतर्गत मूल्यनिर्मिती वाढेल आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील उद्दिष्टांना बळ मिळणार आहे. हा केवळ एक नवीन प्रकल्प नव्हे, तर भारतीय सोलर उत्पादन क्षेत्राच्या भविष्यातील एक मोठी गुंतवणूक आहे.”
EPFO Interest: 8 कोटी लोकांसाठी आनंदाची बातमी… PF बॅलन्स वाढणार, खात्यात जमा होणार व्याजाची रक्कम






