फोटो सौजन्य - सोशल मिडिया
सायन्स स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांकडे करिअरचे बहुविध पर्याय असतात. फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स असलेले विद्यार्थी इंजिनिअरिंग क्षेत्रात कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल, रोबोटिक्स सारख्या शाखांमध्ये काम करू शकतात. तर फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी असलेले MBBS, BDS, BAMS किंवा BHMS, फार्मसी (B.Pharm) किंवा बायोटेक्नॉलॉजी (B.Sc Biotech) सारख्या मेडिकल कोर्सेसला प्रवेश घेऊ शकतात. तसेच एआय आणि डेटा सायन्स, पायलट आर्किटेक्चर संरक्षण क्षेत्रातही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.
कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी फायनान्स आणि मॅनेजमेंटमध्ये अनेक पर्याय आहेत. यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट (CA), कंपनी सेक्रेटरी (CS) आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) हे देखील उत्तम पर्याय आहेत. विद्यार्थी BBA किंवा BMS करून मॅनेजमेंट तर बी.कॉम B.Com करून बँकिंग क्षेत्रात कार्य करू शकतात. तसेच डिजिटल मार्केटिंग, इनव्हेस्टमेंट बँकिंग आणि स्टॉक मार्केटमध्ये करियर करू शकतात.
आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठीही करिअरचे अनेक मार्ग खुले आहेत. बीए (BA) च्या माध्यमातून इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, इंग्रजी विषयात पदवी मिळवता येते. तसेच कायद्याचे शिक्षण (BA LLB/BBA LLB) ,पत्रकारिता आणिं जनसंचार, मिडिया आणि इंडस्ट्रीत शिक्षण घेता येते. फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझाइनिंग, ॲनिमेशन आणि फाईन आर्ट्समध्येही अनेक संधी उपलब्ध आहेत.
नोकरी शोधताय? इंजिनीअरिंगनंतर ४० लाखांचे पॅकेज देणारं ‘हे’ करिअर माहितीये का?
तिन्ही शाखांचे विद्यार्थी युपीएससी, रेल्वे, पोलीस संरक्षण सेवा यासारख्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करू शकतात. याशिवाय सोशल मीडिया मार्केटिंग आणि एआय टूल डेव्हलपमेंट यासारख्या डिजिटल करियरमध्ये वेगाने संधी वाढत आहे. तरी १२ वी नंतर योग्य करियर निवडणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांची आवड, क्षमता व भविष्यकालीन संधी विचारात घेऊन करियर निवडावे.






