फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Air Force Officer Recruitment : भारतीय वायुसेनेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यासाठी एक खुशखबर आहे. आता भारतीय वायुसेनेने ऑफिसर पदांच्या भरतीसाठी AFCAT परीक्षेची नोटिफिकेशन जाहीर केली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भरती लेखी परीक्षा न घेताही वायुसेनेत ऑफिसर बनण्याची संधी उपलब्ध करून देते. पण ती कशी आणि कोणासाठी चला तर मग जाणून घेऊया…
इंडियन एअर फोर्समध्ये ‘स्पेशल एन्ट्री’च्या (Special Entry) माध्यमातून उमेद्वारांना कोणतीही लेखी परीक्षा न देता केवळ शैक्षणिक पात्रता आणि गेट (GATE) स्कोरच्या माध्यमातून भारतीय वायुसेनेत काम करण्याची संधी मिळते. AFCAT साठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा २० मे २०२६ पासून सुरू झाली असून इच्छुक उमेद्वार afcat.edcil.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.
फ्लाइंग ब्रँच (Flying Branch): उमेद्वाराने बारावी गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच तो ग्रॅज्युएशन किंवा 3 वर्षांची BE/B.Tech पदवी उत्तीर्ण असावा किंवा अॅरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सेक्शन A आणि B उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
ग्राउंड ड्युटी- टेक्निकल ब्रँच(Ground Duty – Technical): या पदासाठी तांत्रिक क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे. उमेद्वाकडे बारावी गणित आणि भौतिकशास्त्र किंवा बीएससी भौतिकशास्त्रासह, एमएससी इलेक्ट्रॉनिक्स किंवा ४ वर्षांची इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
अॅरोनॉटिकल इंजिनिअर मेकॅनिकल (Aeronautical Engineer – Mechanical): उमेद्वाराचे बारावीत गणित आणि भौतिकशास्त्र विषय अनिवार्य आहेत. याशिवाय इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमधील ४ वर्षाची पदवी किंवा AMIE / अॅरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे सेक्शन A आणि B उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
‘गेट’ (GATE) स्कोरच्या माध्यमातून उमेद्वारांना कोणतीही लेखी परीक्षा न देता थेट मुलाखतीसाठी बोलवले जाते. यासाठी उमेदवाराकडे BE/B.Tech पदवी आणि संबंधित इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये वैध GATE स्कोर असणे गरजेचे आहे, हा स्कोर मागील ३ वर्षापर्यंतचा वैध मानला जातो.






