फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Government Jobs India : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत ग्रुप-ए, ग्रुप-बी, आणि ग्रुप-सी श्रेणीतील पदे भरली जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार एफएसएसआयच्या (FSSAI) अधिकृत वेबसाईटद्वारे २६ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
एफएसएसएआयने दिलेल्या माहितीनुसार, ही भरती प्रतिनियुक्ती आणि अल्पकालीन कराराच्या आधारावर केली जाणार आहे. यामध्ये जॉइंट डायरेक्टर, मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान- आयटी) आणि ज्युनियर असिस्टंट ग्रेड-II या पदांचा समावेश आहे.
या पदासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, प्रशासन, सरकारी विद्यापीठे, संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम वैधानिक संस्था किंवा स्वयत्त संस्थामध्ये कार्यरत असलेले अधिकारी अर्ज करू शकतात. या पदासाठी उमेद्वाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय एमबीए, वीधी, फूड़ टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, पब्लिक हेल्थ, लाईफ सायन्स, वेटनरी सायन्स, कृषी किंवा संबंधित विषयातील उमेदवार अर्ज करू शकतात. सविस्तर माहितीसाठी उमेद्वारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
या पदासाठी उमेदवाराकडे बी.टेक, एम.टेक, एमसीए किंवा संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित विषयातील पदवी (Graudation) असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला अधिसूचनेत निश्चित केलेल्या नियम व अटी पूर्ण कराव्या लागतील.
या पदासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाज, फाईल व्यवस्थापन, डायरी आणि डिस्पॅच काम तसेच संगणक टायपिंग अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
एफएसएसएआयच्या नियमांनुसार, सर्व पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा कमाल २६ जून २०२६ पर्यंत ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावी.
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती परदेशी सेवा (Foreign Service) अटींच्या अंतर्गत केली जाईल. पदानुसार नियुक्तीचा कालावधी हा सुरुवातीला एक, दोन किंवा तीन वर्ष असू शकतो. गरजेनुसार आणि सरकारी नियमानुसार हा कार्यकाळ पुढे वाढवला जाऊ शकतो.






