Chandrapur News: कोट्यवधींच्या रस्त्याची उधळपट्टी? नागभीडमध्ये नव्याने बांधलेला रस्ता पुन्हा खोदला, नागरिकांमध्ये संतापाची लाट
Raigad News: महाडमध्ये दूषित पाण्याचा कहर! पानसरे मोहल्ल्यात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण
सिमेंट काँक्रीट रस्ते बांधताना भविष्यात पाणीपुरवठा, वीज केबल, दूरसंचार किंवा इतर युटिलिटी सेवांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी रस्ता खोदावा लागू नये, यासाठी ठराविक अंतरावर पेव्हर ब्लॉक बसविण्याची तरतूद केली जाते. या सुविधेसाठी सार्वजनिक निधीतून मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो. मात्र, नागभीडमध्ये या तांत्रिक सुविधेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी अवघ्या दोन मीटर अंतरावर पेव्हर ब्लॉकची सोय उपलब्ध होती, त्या ठिकाणीही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामासाठी थेट सिमेंट काँक्रीट रस्ता खोदण्यात आला. यामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्ता उखडलेल्या अवस्थेत असल्याने वाहनचालक, पादचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. धूळ, चिखल आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. एकीकडे शासन दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिकांनी केला. रस्ता खोदण्यापूर्वी योग्य नियोजन का करण्यात आले नाही, पेव्हर ब्लॉकचा वापर का करण्यात आला नाही आणि चार दिवस उलटूनही दुरुस्तीचे काम का सुरू झाले नाही.
पेव्हर ब्लॉक असताना रस्ता खोदण्याची गरज काय? आणि खोदकाम केल्यानंतर चार दिवसांपासून दुरुस्ती का नाही? असा संताप व्यक्त केला. तसेच याप्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी – शिरीष वानखेडे, माजी नगरसेवक, नागभीड
शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते बांधण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने लाखों रुपये खर्च केले. तसेच रस्ते बांधताना भविष्यातील कामांसाठी पेव्हर ब्लॉकची व्यवस्था करण्यात आली असताना, त्याचा वापर न करता थेट सिमेंट रस्ताच का खोदण्यात आला? त्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.






