फोटो सौजन्य- सोशल मीडिया
UPSC Defence Exams 2026 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी II (NDA), नौदल प्रबोधनी II (NA) आणि एकत्रित संरक्षण सेवा II (CDS) २०२६ परीक्षेची अधिकृत सूचना जाहीर केली आहे. या परीक्षेच्या अधिकृत वेळापत्रानुसार, १३ सप्टेंबर रोजी परीक्षा घेतल्या जातील. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय तरूणांना विविध क्षेत्रात अधिकारी होण्याची संधी मिळते.
या परीक्षेला अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख ९ जून २०२६ आहे, तसेच १३ सप्टेंबर २०२६ रोजी परीक्षा असेल.
उमेद्वारांने परीक्षेच्या दिवशी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा किमान ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहचावे लागेल. कारण उशिरा येणाऱ्या उमेद्वारांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच उमेद्वाराकडे परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी अधिकृत फोटो आणि ओळखपत्र असणे आवश्यक आहे, प्रवेशपत्र (Admit Card) जारी केल्यानंतर उमेद्वार आपल्या लॉगिन क्रेडेंशियलचा वापर करून यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून ते डाऊनलोड करू शकतील
सीडीएस २ (CDS II) मध्ये किती जागा रिक्त आहेत?
एनए २ (NA II) मध्ये किती जागा रिक्त आहेत?






