फोटो सौजन्य : गुगल
खरंतर व्यवसाय करणं देखील तसं सोपं नाही पण करायचा म्हटल्यानंतर तो नक्की कोणता करायचा आणि सरकार मान्य व्यवसाय कोणते आहेत? हेच सविस्तर जाणून घेऊयात. जर पदवी तुमच्या हातात नसेल तर त्यानंतरही तुम्ही हा व्यवसाय नक्कीच करू शकता आणि इतकंच नाही तर त्यामध्ये तुम्हाला तब्बल 25 ते 45 टक्के नफाही होऊ शकतो. आता ते कसं हे देखील जाणून घेऊया.
भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे दर महिन्याला दोन प्रकाशनं छापली जातात. एक म्हणजे साप्ताहिक आणि दुसरं म्हणजे मासिक. आता सर्वात आधी हे नक्की काय आहे आणि यामधून तुम्हाला कोणती माहिती मिळू शकते हे आपण समजून घेऊया. एम्प्लॉयमेंट न्यूज ज्यातून तुम्हाला सरकारी नोकरी कुठे आणि कोणती उपलब्ध आहे याची माहिती मिळते. योजना आणि स्पर्धा परीक्षा कोणत्या आहेत आणि त्यासाठी काय तयारी करावी लागते यासाठी विद्यार्थ्यांना माहिती देणारं हे मासिक आहे. बाल भारती साधारण वय वर्ष पाच ते पंधरा मधील शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी हे मासिक आहे. या प्रकाशनांसाठी distributer म्हणून काम करण्याची संधी आणि व्यवसाय करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त शिक्षण असण्याची अट नाही आणि पदवी असण्याची गरज देखील नाही.
वितरक म्हणून प्रकाशनाची प्रत तुम्हाला अगदी कमी सवलतीच्या दरामध्ये मिळवता येते आणि ती तुम्हाला किरकोळ दरामध्ये बाजारात विकता येते. आता या प्रतीनुसार ही सवलत कशी मिळते हे देखील आपण समजून घेऊ. एम्प्लॉयमेंट न्यूज साठी प्रतींची संख्या जर 20 हजार असेल तर त्याचा नफा असतो 25 टक्के. 1 हजार एक ते 2 हजार असेल तर 35 टक्के नफा मिळतो. 2 हजार एक किंवा त्यापेक्षा अधिक प्रती असतील तर चाळीस टक्के नफा मिळतो. याशिवाय मासिकांसाठी आपण बघू. मासिकांसाठी प्रतींची संख्या 20 ते 250 असल्यास 25 टक्के नफा मिळतो. 251 ते 1 हजार प्रती असल्यास 40 टक्के नफा मिळतो. 1 हजार किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास 45 टक्के नफा मिळतो. आता नोंदणी आणि गुंतवणुकीसाठी नेमकी अट काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया.
University of Mumbai एलएलएम सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला होणार परीक्षा
जर नोंदणी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला केवळ एक हजार शुल्क आहे. नियतकालिकांसाठी सुरुवातीच्या खरेदीच्या 3पट रक्कम यासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही देखील व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर हा शासनाचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.
PCM CET निकाल लवकरात लवकर जाहीर करा! Vaibhav Thorat यांची मागणी






