जेष्ठ कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार; मुंबईत सिने वेलफेअर ट्रस्टच्या कार्याचा गौरव
सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने ज्या विश्वस्थ कलाकारांनी आपले अमूल्य योगदान दिले, त्यामध्ये प्रामुख्याने सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आशा पारेख, अमरीश पुरी, अमजद खान, चंद्रशेखर वैद्य, दारासिंह या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी त्या कलाकारांचे फोटो आणि माहिती देणाऱ्या फलकाचे उदघाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले की, अभिनय क्षेत्रातील प्रत्येक कलाकाराचा एक प्रसिद्धीचा काळ असतो. तो चांगला काळ ओसरला की सरत्या काळात त्या कलाकारांकडे कुणी पाहत नाही. त्यांची कुणी चौकशी करत नाहीत. असे जवळपास ९ ते १० हजार कलाकार सध्या अभिनय क्षेत्रात आहेत. अशा कलाकारांचे दैनंदिन जीवन अतिशय हलाखीचे असते. यामध्ये अभिनय क्षेत्रात काम करणारे इतर कामगार यांची संख्या देखील मोठी आहे. याना सामाजिक जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी माहिती मला सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट च्या अध्यक्षा प्रीती सप्रू यांनी दिली. या सर्व समस्यांचे निराकरण करण्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
तसेच जेष्ठ कलाकारांकरिता मी कोकणातील केसरी, सावंतवाडी येथील माझी स्वतःची एक एकर जागा देण्यास तयार आहे, असे रविंद्र चव्हाण म्हणाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी रविंद्र चव्हाण यांच्या सोबत जेष्ठ अभिनेत्री प्रीती सप्रू, ट्रस्टच्या सचिव अभिनेत्री संभावना सेठ, संस्थेचे खजिनदार अभिनेते दीपक पराशर, बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव, मनोज जोशी, मुकेश ऋषी, आयुब खान, अभिनेत्री कुनिका आणि सिने व टीव्ही क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित होते.
“मी खूप लाजाळू…”, ‘Ek Din’ च्या निमित्ताने Aamir Khan ने केला खुलासा, उलगडला जुन्या आठवणींचा पिटारा






