(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्राथमिक तपासानुसार, रेल्वे क्रॉसिंगचे बॅरियर्स सिग्नल लागल्यामुळे बंद झाले होते. परंतु तरीही स्कूल बस ट्रॅकवर गेली होती. याच वेळी दुसऱ्या बाजूने बुगेनहाउटकडे जाणारी ट्रेन वेगाने सरकत होते. लोकोपायलटने बस ट्रॅकवर पाहताच ट्रेनचा ब्रेक मारला. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. ट्रेनची जोरदार धडक झाली आणि स्कूलबस उलटली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. केवळ एका प्रवाशाला मानसिक धक्का बसला असून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.
सध्या हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरु आहे. रेल्वे फाटक बंद असतानाही स्कूल बस ट्रॅकवर कशी आली याचा शोध घेतला जात आहे. चालकाचा मृत्यू झाल्याने याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.
Several people killed after a train collided with a school bus at a railway crossing in Buggenhout, Belgium. pic.twitter.com/DNoFDePpXQ — World Source News (@Worldsource24) May 26, 2026
बातमी अपडेट होत आहे.






