कसा झाला अपघात?
या अपघातातील तिन्ही मित्र कोरेगाव एका कंपनीत एकत्र काम करत होते. सुट्टी मिळाल्याने त्यांनी कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे जाण्याचा बेत आखला. ते तिघेही निघाले आणि कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाच्या हद्दीत आले असता त्यांच्या भरधाव वेगातील करवरील नियंत्रण सुटले.( Accident News) हा अपघात इतका भीषण होता की, ही कार रस्त्यावरच २ ते ३ वेळा पलटी झाली. त्यांनतर रस्त्यालगत असलेल्या खोल झाडीत जाऊन अडकली. या भीषण अपघातात कारमधील तरुण एका तरुणाचा मृत्यू झाला तर २ तरुण जखमी झाले आहे. ( Accident News)
Beed Crime: लग्नानंतर मुलगी गर्भवती; रुग्णालयातील तपासणीत धक्कादायक खुलासा
स्थानिकांनी धाव घेत बचावकार्य केले
मध्यरात्रीच्या शांततेत झालेल्या या अपघाताचा आवाज ऐकून वडोली भिकेश्वर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. गाडी झाडीत अडकल्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या अंधारातच मोठ्या शिताफीने मदतकार्य राबवून जखमींना गाडीबाहेर काढले. (Accident News) त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे. (Accident News)
एकाच मृत्यू तर…
ओंकार खंडागळे (वय २३ वर्ष) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ओंकार हा बीड जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या कामाच्या निमित्ताने पाटण येथे राहत होता. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रशिक धावणे (वय २८ वर्ष, मूळ रा. चंद्रपूर जिल्हा) असे आहे. प्रशिकवर रुग्णालयात अतिदक्षाता विभागात उपचार सुरु आहे. (Accident News) तिसरा युवक हा सातारा जिल्ह्यातील पडळ येथील रहिवासी असून तो सुदैवाने या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातामुळे कोरेगाव आणि मृताच्या मूळ गावी बीड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Latur Accident: भरधाव ट्रकचा कहर! दुचाकी आणि कारला धडक; लातूरमध्ये तिघांचा मृत्यू
Ans: कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाजवळ हा भीषण अपघात झाला.
Ans: बीड जिल्ह्यातील 23 वर्षीय ओंकार खंडागळे यांचा जागीच मृत्यू झाला.
Ans: स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले.






