Crime news updates
बीड जिल्ह्यातील पाटोद्याजवळ एका भीषण अपघात झाला. या अपघातात वडील आणि मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. दरम्यान, दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. बीडच्या पाटोदा शहराजवळ पुण्याहून केजकडे जाणारी भरधाव वेगातील कार पुलाच्या कठड्याला धडकून ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. या अपघातात अश्फाक शेख (40 वर्षे) आणि त्यांचा मुलगा अल्ताफ शेख (15 वर्षे) हे दोघेही जागीच ठार झाले आहेत. पुण्यावरून हे दोघेही आपल्या गावी म्हणजेच केजकडे येत होते. मात्र, पाटोदाजवळ आले असता त्यांच्या कारचा अपघात झाला
11 May 2025 04:08 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज भागातील गुजरवाडी परिसरात अनैतिक संबंधांना विरोध केल्याने जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पसार झालेल्या दोघांना अटक केली आहे. मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, गुजरवाडी रस्ता, मांगडेवाडी, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय ३२), केशव मोतीराम असोरे (वय २६, दोघे रा. खोपडेनगर, गुजरवाडी, कात्रज) यांना अटक करण्यात आली.
11 May 2025 03:10 PM (IST)
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ गातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. असातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एटीएममधून रोकड काढण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाकडे मदतीचा बहाणा करुन चोरट्यांनी १ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली आहे. याबाबत ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
11 May 2025 02:36 PM (IST)
पंढरपूर रोडवर शुक्रवारी (दि.९) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलिस असल्याचा बनाव करून पती-पत्नीच्या अंगावरील सव्वा तीन लाखांचे सोन्याचे दागिने लांबवण्याची घटना घडली आहे. ही घटना मोहोळ शहरापासून अवघ्या काही अंतरावर काळे पंपाच्या पुढे घडली आहे. पोखरापूर येथील जयश्री लक्ष्मण दळवी यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे, यावरुन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
11 May 2025 02:26 PM (IST)
केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक नवविवाहित नवरी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा तिने आपल्या खोलीतील कपाटाचा दरवाजा उघडला. तेव्हा सर्वांना धक्काच बसला. २२ लाख रुपयांचे दागिने गायब झाले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन दिवसानंतर ते दागिने त्या घराजवळच सापडले. सविस्तर बातमी..
11 May 2025 01:19 PM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील भाविक उज्जैन येथे देवदर्शनास निघाले होते. यावेळी ते लोणंद जवळ येथील सालपे घाटात रात्री आली असता ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ही घटना इतकी भीषण होती, की दोन्ही गाड्यांचा चकाचूर झाला. ही घटना रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील सालपेजवळील बिरोबा मंदिरासमोर घडली. या अपघातात ट्रॅव्हल्स चालक व एक महिला जागीच ठार झाले, तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली होती. तिचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
11 May 2025 12:51 PM (IST)
कुटुंबीयांचा मानसिक त्रास आणि प्रेमात अपयश या दुहेरी कारणांमुळे एका 27 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुटीबोरी येथे उघडकीस आली आहे. रोहित कलीराम बारंगे (वय 27, रा. चौकीया, ता. बैतूल, मध्यप्रदेश, सध्या रा. प्रभाग क्र. 1, पठाण ले-आउट, बुटीबोरी, नागपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
11 May 2025 12:03 PM (IST)
पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने ऑनलाईन लाच घेण्याचा प्रताप केला आहे. शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तो अडकला. छत्रपती संभाजीनगरमधील सहायक फौजदारास अटक करण्यात आली आहे. बांधकामासाठी लागणारी वाळू, खडी वाहतुकीसाठी एका 30 वर्षीय ठेकेदाराकडून लाच मागण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहर वाहतूक विभागाचा सहायक फौजदार अशोक वाघ याने ही लाच मागितली. ठेकेदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर संभाजीनगरमधील हर्सुल टी पॉइंटवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अशोक वाघ यांना अटक केली. अशोक वाघ याने एक हजारांची लाच मागून चक्क ती ‘फोन-पे’ने स्वीकारली. सेवानिवृत्तीस अवघे दीड वर्ष असताना त्यांनी ऑनलाईन लाच घेण्याचे धाडस केले.
11 May 2025 11:01 AM (IST)
अमरावतीतुन मोठी एक बातमी समोर आली आहे. सकाळी दहा वाजताच्या सुमारास प्रशांत ठाकूर हे व्यक्ती एमआयडीसी मधील व्हेरिटो कंपनीमध्ये कर्मचारी आहेत. याच व्यक्तीच्या मोबाईल फोनवर व्हाट्सअपद्वारे कॉल करून दिल्लीसह चार ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी देण्यात आली.मजुराने भीतीपोटी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीस प्रशासन आता सज्ज झाले आहे. सध्या या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी दिली आहे.
11 May 2025 10:20 AM (IST)
छत्तीसगडच्या बलरामपूर- रामानुजगंज जिल्ह्यातील कुसमी पोलीस स्टेशन अंतर्गत चैनपूर पंचायतीच्या पहाडी कोरवा वस्तीमध्ये एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. तिने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता म्हणून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पाटील अटक केली आहे. आरोपीचा नाव बबुआ कोरवा (वय 25) अशी आहे. ही घटना बुधवारी रात्रीची आहे. सविस्तर बातमी...
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीचा संताप, पत्नीची केली हत्या
11 May 2025 10:01 AM (IST)
भारत व पाकीस्तानमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाही समाजमाध्यमांवर पाकीस्तान जिंदाबाद असा आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी कोंढव्यातील एका १९ वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. कोंढवा पोलिसांनी संबंधित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिच्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सुभाष जरांडे यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलिस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.
11 May 2025 09:44 AM (IST)
सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातारा शहरांमध्ये नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणांमध्ये एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवराज पंकज कणसे (वय २४, रा. हिलटॉप सोसायटी, शाहूनगर, गोडोली), साईकुमार महादेव बनसोडे (वय २५, रा. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), सुदीप संजय इंगळे (वय १९, राहणार कोयना सोसायटी सदरबाजार सातारा), अतुल विलास ठोंबरे (वय २०, रा. झेडपी कॉलनी, शाहूपुरी, सातारा), तयब हाफिस खान (वय २३, रा. बांगुर नगर, गोरेगाव, मुंबई) या ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.